नविन कांदा येईपर्यंत दर चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 07:46 PM2019-09-21T19:46:43+5:302019-09-21T19:49:10+5:30

लासलगाव (शेखर देसाई) पावसाने कर्नाटक राज्यातील पुरपरिस्थितीमुळे कांदा पिकाचे नुकसान आणि आंध्र प्रदेशात लागवडीतच पावसाने कांदा खराब झाल्याने देशांतर्गत मागणीचा जोर महाराष्ट्रावर व विशेषता नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत वाढला व कांदा कमी असुन नवीन मुबलक कांदा बाजारपेठेत दाखल होण्यास दोन महीने कालावधी लागणार असल्याने बाजार भाव कमी होणार नाहीत असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

The prices will go up until the new onion arrives | नविन कांदा येईपर्यंत दर चढेच

नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील

Next
ठळक मुद्देलासलगाव : नाफेड संचालक नानासाहेब पाटील

लोकमत संडे स्पेशल मुलाखत
लासलगाव (शेखर देसाई) पावसाने कर्नाटक राज्यातील पुरपरिस्थितीमुळे कांदा पिकाचे नुकसान आणि आंध्र प्रदेशात लागवडीतच पावसाने कांदा खराब झाल्याने देशांतर्गत मागणीचा जोर महाराष्ट्रावर व विशेषता नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत वाढला व कांदा कमी असुन नवीन मुबलक कांदा बाजारपेठेत दाखल होण्यास दोन महीने कालावधी लागणार असल्याने बाजार भाव कमी होणार नाहीत असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
कांदा भाववाढीचे गणित व भविष्यात होणारे कांदा बाजारपेठेतील संभाव्य बदल याबाबत नानासाहेब पाटील यांनी अभ्यासपुर्ण विवेचन दिले आहे.
कांदा स्थिराकरण योजनेनुसार खरेदी केलेला कांदा शासनाच्या सुचनेनुसार दररोज किमान तिनशे टन मोठ्या शहरात पाठविला जात असुन केंद्र शासन रास्त दरात हा कांदा ग्राहकांना विक्र ी करीत योग्य भावात मिळाला पाहीजे यासाठी जोरदार काम करीत आहे. आतापर्यंत दिल्ली, कोलकत्ता,चेन्नई व सिलीगुडीसह मोठ्या शहरात कांदा रवाना होऊन तो वितरीत करण्यात आला असल्याची माहीती लोकमतशी बोलतांना पाटील यांनी दिली.
आंध्र व कर्नाटक राज पावसाने कांदा खराब झाला आहे.त्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादन कमीच होते. देशातील इतर राज्यांत मागणी पुरी करण्याची जबाबदारी मुख्यते नाशिक जिल्ह्यावर आली आहे.
नागपंचमीला लागण होणारा कांदा येत्या ५ आॅक्टोबर पर्यंत बाजारपेठेत येतो व उन्हाळ कांद्याची मागणी कमी होते. यावेळी दुर्दैवाने नागपंचमी सणाचे वेळी लागवड पावसाने झाली नाही ती विलंबाने झाली. त्यामुळे आता हा कांदा आॅक्टोबर महीन्यात बाजारपेठेत येणार नाही. तो नोव्हेंबर अखेरीस बाजारात विक्र ीस आला व त्यात आवकेचे प्रमाण वाढल्या नंतरच भाव पुर्वपदावर येतील असे दिसत आहे.
कांदा लागवडीसाठी पाऊस वेळेवर आहे का किंवा कांदा लागवडीनंतर अतिवृष्टीमुळे कांदा पिक वाचविता येत नाही. ही सर्व नैसर्गिकरीत्या होणारी प्रक्रि या असुन त्याचा परीणाम बाजारपेठेत होत असतो, म्हणुन मागणीचा दाब अधिक वाढला तर कांदा अधिक भाव देणार आहे. तरी गेल्या काही महिन्यापासून साठवणुक केलेला कांदा त्यातील निघणारा नाशवंत कांदा तसेच होणारी वजनातील कांदयाची घट ही देखील मोठी आहे. भाववाढ झाली तरी कांदा उत्पादकांच्या उत्पन्नाचे प्रमाण कमी आहे. ही बाब नजरेआड करता येणार नसल्याचे ते म्हणाले.
देशाला दररोज ५० हजार मेट्रिक टन कांदा हा खाण्यासाठी लागतो. त्यामुळे सत्तेत कोणीही असल्यास इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा आयात करू शकणार नसल्याचे सांगत कांदा आयात करण्याची जरी निविदा काढण्यात आली असली तरी, कांद्याच्या बाजारभावावर कुठलाही परिणाम होणार नाही.
येणाऱ्या दिवसात नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अशीच कांद्याची होलसेल बाजारात भाव वाढ होणार आहे. कांदा भाव वाढीतून शहरी भागातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ५० हजार मेट्रिक टन खरेदी केलेल्या कांद्यातून आतापर्यंत २५ टक्के म्हणजे साडेबारा हजार मेट्रिक टन कांदा हा शहरी भागात पाठवण्यात आला आहे, असे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
(फोटो २१ लासलगाव कांदा, २१ नानासाहेब पाटील)

Web Title: The prices will go up until the new onion arrives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.