स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या सुनीता पाटील यांचा गौरव
By admin | Published: March 8, 2016 11:11 PM2016-03-08T23:11:53+5:302016-03-08T23:31:19+5:30
स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या सुनीता पाटील यांचा गौरव
नाशिक : जिवंत माणसे दगा देतात, पण मृतदेह कधीच दगा देत नाहीत म्हणूनच मी त्यांची सेवा करते, असे प्रतिपादन पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी मदत करणाऱ्या सुनीता पाटील यांनी केले आहे. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी सर्व प्रकारची मदत करणाऱ्या सुनीता पाटील यांचा महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी कृती समितीच्या वतीने अध्यक्ष आकाश पगार यांच्या हस्ते पंचवटी स्मशानभूमी येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी सुनीता पाटील बोलत होत्या. अंत्यविधीसाठी आलेल्या मृतांच्या नातेवाइकांना मदत करणे, त्यांची सेवा करणे हे पवित्र काम असल्याची भावना पाटील यांनी यावेळी बोलून दाखविली. यावेळी विद्यार्थी कृती समितीचे विशाल गांगुर्डे, ललित पिंगळे, सिद्धांत आमले, आकाश भामरे, सचिन पवार, गजू पगारे, भावेश पवार, राजेंद्र पाटील आदि उपस्थित होते.