सामाजिक भान जपणाऱ्या मान्यवरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:59 AM2018-07-01T00:59:32+5:302018-07-01T00:59:49+5:30

सिन्नर-घोटी बायपासवर कार व दुचाकी अपघातातील जखमींना उपचारासाठी मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो व शूटिंग काढत असताना शिर्डीतून शूटिंग आटोपून परतणारे अभिनेते चिन्मय उद्गीरकर यांनी आपली कार थांबवून सामाजिक भान जपून जखमींचा जीव वाचविण्यासाठी केलेली धडपड तसेच रिक्षामध्ये प्रवाशांकडून विसरलेल्या बॅगमधील दागिने व पैसे प्रामाणिकपणे परत करणाºया दोन रिक्षाचालकांचा पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी (दि़२९) एका छोटेखानी समारंभात गौरव केला़ अपघातसमयी जखमींना मदत हे आपले कर्तव्य असून, प्रामाणिकपणा आवश्यक असल्याचे सिंगल यांनी यावेळी सांगितले़

 Pride of dignitaries honoring social dignity | सामाजिक भान जपणाऱ्या मान्यवरांचा गौरव

सामाजिक भान जपणाऱ्या मान्यवरांचा गौरव

googlenewsNext

नाशिक : सिन्नर-घोटी बायपासवर कार व दुचाकी अपघातातील जखमींना उपचारासाठी मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो व शूटिंग काढत असताना शिर्डीतून शूटिंग आटोपून परतणारे अभिनेते चिन्मय उद्गीरकर यांनी आपली कार थांबवून सामाजिक भान जपून जखमींचा जीव वाचविण्यासाठी केलेली धडपड तसेच रिक्षामध्ये प्रवाशांकडून विसरलेल्या बॅगमधील दागिने व पैसे प्रामाणिकपणे परत करणाºया दोन रिक्षाचालकांचा पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी (दि़२९) एका छोटेखानी समारंभात गौरव केला़ अपघातसमयी जखमींना मदत हे आपले कर्तव्य असून, प्रामाणिकपणा आवश्यक असल्याचे सिंगल यांनी यावेळी सांगितले़  सिन्नर-घोटी बायपासवर शनिवारी (दि़२३) रात्री आठ वाजेच्या सुमारास एका वाहनाने दुचाकी व कारला धडक दिली़ यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने कारमधील महिला त्यास रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्याने येणाºया-जाणाºया वाहनांना मदतीसाठी थांबण्याचे आवाहन करीत होती़़ बहुतांशी वाहनचालक हे गाडीचा वेग कमी करून पाहून निघून जात होते तर काही फोटो व व्हिडीओ काढत होते; मात्र मदतीला कोणीही थांबत नव्हते़ याचवेळी मराठी चित्रपट अभिनेते चिन्मय उद्गीरकर हे शिर्डीहून शूटिंग आटोपून येत होते़ त्यांना अपघात दिसताच त्यांनी तत्काळ आपल्या कारचा चालक विजय जाधव यांच्या मदतीने जखमीस स्वत:च्या कारमधून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ तसेच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल तसेच पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना घटनेची माहिती दिली़  पोलीस यंत्रणेने तत्काळ प्रतिसाद दिला तसेच घोटीचे पोलीस निरीक्षक भालेराव हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मदतकार्य केले़ मात्र, उशीर झाल्याने सदर व्यक्तीचा जीव वाचू शकला नसला तरी उद्गीरकर यांनी जपलेले सामाजिक भान महत्त्वाचे आहे़ त्यांच्या या कार्याची दखल घेत आयुक्त डॉ़ सिंगल यांनी गुन्हे बैठकीत उद्गीरकर व जाधव या दोघांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच रिक्षात विसरलेल्या प्रवाशांचा किमती ऐवज प्रामाणिकपणे परत करणारे भद्रकाली व पंचवटी भागातील संजय धोंगडे व राजू शिंदे हे दोन रिक्षाचालक व पोलीस मित्र राकेश वाघ यांचाही सन्मान केला़
यावेळी चांगली कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला तसेच चिराग वाल्मीक या निरीक्षण गृहातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व पोलीस आयुक्तालयाने स्वीकारले़  यावेळी पोलीस उपायुक्त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

Web Title:  Pride of dignitaries honoring social dignity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.