एसटी महामंडळात स्त्रीशक्तीचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:24+5:302021-03-09T04:17:24+5:30
महिला दिनानिमित्ताने एन.डी. पटेल रोडवरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालयात कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. ...
महिला दिनानिमित्ताने एन.डी. पटेल रोडवरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालयात कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील उपस्थित होते. डॉ. किर्लोस्कर यांनी महिलांचे आरोग्य आणि कोविड-१९ संबंधित लस घेण्याचे फायदे, मास्क वापरणे गरजेचे, वारंवार हात धुणे, दोन व्यक्तींमधील अंतर, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम टाळणे, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. विभाग नियंत्रक पाटील यांनी महिलांनी घर आणि नोकरी सांभाळताना दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःचे आरोग्यदेखील सांभाळावे याबाबत मार्गदर्शन केले. सर्व महिला कर्मचाऱ्यांनी कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम साजरा केला.
सूत्रसंचालन मीना काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामगार अधिकारी जहाँआरा शेख, शारदा ढिकले, सोनाली पाटील, चैताली भुसारे, सुवर्णा कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
नाशिक आगारातदेखील जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यवस्थापक दिलीप नलावडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. नलावडे आणि सहायक कार्यशाळा अधीक्षक स्वप्निल उफाडे यांच्या हस्ते उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले.
===Photopath===
080321\08nsk_36_08032021_13.jpg
===Caption===
एस.टी. विभागीय कार्यालयात आयेाजित महिलादिन कार्यक्रमप्रसंगी उपस्थित महिला कर्मचारी.