वंजारवाडीत आजी-माजी सैनिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:54+5:302021-08-19T04:17:54+5:30
या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वंजारवाडी व लोहशिंगवे या दोन गावांतील सैनिकांची ...
या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वंजारवाडी व लोहशिंगवे या दोन गावांतील सैनिकांची संख्या दोनशेच्या आसपास असून, एकाच घरातील तीन तरुण भारतीय सैन्यदलात आहेत हे अभिमानास्पद आहे. प्रत्येक घरात सैनिक तयार करा, असे आवाहनही त्यांनी केले. संस्थेचे कार्यवाह मधुसूदन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी आजी - माजी सैनिकांना राखी भेट देत रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडला. सूत्रसंचालन अमरसिंग परदेशी यांनी केले तर शेवटी श्रीमती काळे यांनी देशभक्तीपर ओव्या गात उपस्थित मान्यवर व सैनिकांचे आभार मानले. याप्रसंगी शिक्षण मंडळाचे सदस्य जितेंद्र भावसार, अनंत अथनी, रामभाऊ शिंदे, वृषाली कातकाडे, प्रज्ञा पवार, श्रीमती पिल्ले, भाऊसाहेब कडभाने, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, मुख्याध्यापक प्रवीण रोकडे, लोहशिंगवेचे सरपंच युवराज जुंद्रे, माजी सरपंच संतोष जुंद्रे, माजी उपसरपंच व माजी सैनिक शिवाजी डांगे, तुकाराम काजळे, राजू मुसळे, किरण काजळे, पोलीस पाटील त्र्यंबक शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो- १८वंजारवाडी
वंजारवाडी येथील अमित पंड्या नूतन माध्यमिक विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिनी आजी - माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, कार्यवाह मधुसूदन गायकवाड, मुख्याध्यापक प्रवीण रोकडे, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, श्रीमती काळे व शिक्षकवृंद व माजी - आजी सैनिक.
180821\18nsk_14_18082021_13.jpg
फोटो- १८वंजारवाडी