जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकºयांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:29 AM2018-07-02T00:29:51+5:302018-07-02T00:36:23+5:30

नाशिक : सामूहिक शेती प्रयोगामुळे शेतीव्यवसाय सकारात्मक बदल झाला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाºया शेतकºयांमुळे उत्पादनात वाढ होत आहे. शासनाकडून शेतकºयांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आदर्श शेतकºयांनी पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.

The pride of the laboratory farmers in the district | जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकºयांचा गौरव

जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकºयांचा गौरव

Next
ठळक मुद्देयोजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आदर्श शेतकºयांनी पार पाडावी,

नाशिक : सामूहिक शेती प्रयोगामुळे शेतीव्यवसाय सकारात्मक बदल झाला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाºया शेतकºयांमुळे उत्पादनात वाढ होत आहे. शासनाकडून शेतकºयांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आदर्श शेतकºयांनी पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषदेत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग काले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, जिल्हा वनअधिकारीरणावत, माजी प्रकल्प संचालक अशोक कांबळे, निवृत्त पोलीस कॉन्सटेबल काका चव्हाण, कृषी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सुनील वानखेडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सांगळे म्हणाल्या की, जिल्'ातील शेतकºयांनी चांगले काम केलेले आहे. या शेतकºयांनी इतर शेतकºयांना प्रगतशेतीकडे वळविले पाहिजे. दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतीविकासाची पायाभरणी केली आहे याचा अभिमान असल्याचे सांगळे यांनी यावेळी सांगितले. कृषी समिती सदस्य महेंद्रसिंग काले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सांगितले, वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजना, जलसंधारण, संकरित बियाणे मोहीम राबवून हरित शेतीसमृद्ध केली.
याप्रसंगी प्रयोगशील शेतकरी, संस्था आणि बचतगटांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि शेवग्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेमुळे एक लाख २५ हजार क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार ही योजना आता लोकचळवळ झाली आहे. विशेष म्हणजे अनेक खासगी कंपन्या आपल्या सीएसआर फंडाद्वारे या चळवळीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे हजारोंच्यावर गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा पडवळ यांनी केला. यावेळी त्यांनी उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचीही माहिती दिली. कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी आभार मानले.

बचतगट
दारणामाई स्वयंसहा, बचत गट, पळसे, नाशिक, कश्यपी सेंद्रिय शेतमाल बचत गट, वाघेरा, त्र्यंबकेश्वर, शाश्वत शेतकरी बचत गट, दोडी बु., सिन्नर, कश्यप कृषी विकास गट, जोपूळ, चांदवड, श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळ, पुरणगाव, येवला, माती फाउण्डेशन सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट, रावळगाव, मालेगाव, श्रीशंकर महाराज सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट, अंतापूर, सटाणा
संस्था 
रोकडेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., निमगाव, सिन्नर, ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., उगाव, निफाड, ३) फायुस्टार ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., सावकी, देवळा, शिवराणा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., नारूळ, कळवण, पंचरत्न फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., पानेवाडी, नांदगाव, दारणामाई फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., मुकणे, इगतपुरी, मल्हार अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., बोपेगाव, दिंडोरी.
पीक स्पर्धा विजेते
गोरख हिरामण केकाणे, सायगाव, येवला (प्रथम खरीप), शिवाजी रामा सोनवणे, साताळी, येवला ( द्वितीय खरीप)े, मच्छिंद्र चंद्रभान उशीर, सायगाव, येवला (तृतीय खरीप), रतन नामदेव पैठणकर, नगरसूल, येवला (प्रथम रब्बी), श्रीमती कमला रतन पैठणकर, धूळगाव, येवला (द्वितीय रब्बी), श्रीमती मीनाबाई गणपत अनथ, नगरसूल, येवला (तृतीय रब्बी).
वैयक्तिक शेतकरी
बबनराव धोंडीराम कांगणे, दोणवाडे, ता. नाशिक, जयराम होनाजी गायकवाड, उंबरपाडा दि., ता. सुरगाणा, अविनाश मनोहर पाटोळे, वडनेर भैरव., ता. चांदवड बद्रीनाथ रामभाऊ जाधव, वडगाव, बल्हे, ता. येवला, समाधान काशीनाथ वाघारे, कोणे, ता. त्र्यंबकेश्वर, महेश जिभाऊ पाटील, मुळाणे, ता. सटाणा,भागवत विठोबा बलक, वडगाव, ता. सिन्नर, शिवाजी कोंडाजी मोंढे, अडसरे, ता. इगतपुरी, धनंजय विश्वासराव देशमुख, तळवाडे, ता. मालेगाव, श्रावण पावजी गायकवाड, पाठरूण, ता. कळवण, प्रकाश बापूराव पाटील, सावकी (लो.), ता. देवळा,
सुधाकर दगू पवार, नागापूर, ता. नांदगाव, यशवंत महादू गावंडे, गावंधपाडा, ता. पेठ.

Web Title: The pride of the laboratory farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.