दापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 06:41 PM2020-08-05T18:41:53+5:302020-08-05T18:44:57+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील दहावीच्या परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसरस्वती फाऊंडेशन व आर.बी.फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच गौरव करण्यात आला.

Pride of meritorious students at Dapur | दापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सिन्नर तालुक्यातील दापूर येथे शिवसरस्वती फाऊंडेशन व आर. बी. फाऊंडेशन यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, कविता सानप, अशोक आव्हाड, तेजस आव्हाड आदी.

Next
ठळक मुद्देयशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार घरोघरी जाऊन करण्यात आला.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील दहावीच्या परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसरस्वती फाऊंडेशन व आर.बी.फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच गौरव करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे तालुक्यातील दापूर येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली रेणुका गणेश चकणे (96.20), द्वितीय वैभव संतोष आव्हाड (95.40), तृतीय दिव्या कचरु बोडके (92.80)व सिध्दी संपत- सांगळे (92.80) या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आर.बी फाऊंडेशनचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड यांच्या हस्ते घरोघरी जाऊन करण्यात आला. आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन तसेच विविध शासकीय दाखले काढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आव्हाड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक आव्हाड, गुळवंचच्या माजी सरपंच कविता सानप, संतोष आव्हाड, तेजस आव्हाड, जयराम सांगळे, संपत सांगळे आदीसह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
 

Web Title: Pride of meritorious students at Dapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.