मालेगावी केबीएच विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:42+5:302021-08-23T04:17:42+5:30
प्रमुख अतिथी म्हणून म. स. गा. महाविद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे संचालक डॉ. दिनेश शिरूडे, माजी प्राचार्य अनिल ...
प्रमुख अतिथी म्हणून म. स. गा. महाविद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे संचालक डॉ. दिनेश शिरूडे, माजी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र पाटील, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक संजीव महाले, संजय शिंदे, नितीन गवळी उपस्थित होते.
दहावीतील गुणवंत विद्यार्थी नचिकेत भदाणे, भाग्येश अहिरे, रोशन खैरनार, हर्षल खैरनार या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अभिनंदन पत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी आदिती पवार, प्रतीक्षा आहिरे या प्रथम व द्वितीय विद्यार्थिनीचे संस्थेचे अभिनंदन पत्र व गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक वैशाली पवार व संदीप आहिरे यांचाही सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेतील वेदांत नेरकर, ईश्वर निकम, प्रणव पुरकर, स्वरूप कोठावदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक आर. डी. शेवाळे, प्रा. श्वेता पाटील, बी. पी. सोनवणे यांचाही प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी प्राचार्य शिरूडे, माजी प्राचार्य अनिल पवार यांचा सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थी नचिकेत भदाणे, रोशन खैरनार, हर्षल खैरनार, आदिती पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक यांचा सत्कार एम. आर. आहिरे, प्रा. विश्वास पगार, प्रा. प्रफुल्ल निकम, प्रा. प्रल्हाद बच्छाव, जे. टी. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. राजेंद्र शेवाळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. राजेश धनवट यांनी आभार मानले.