मनपा शाळेचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:06 PM2019-01-19T23:06:42+5:302019-01-20T00:04:22+5:30
महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित गोवर, रुबेला लसीकरण मोहीम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक २८ मधील शिक्षकांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सातपूर : महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित गोवर, रुबेला लसीकरण मोहीम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक २८ मधील शिक्षकांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
संपूर्ण शहरात राबविण्यात आलेल्या गोवर, रुबेल लसीकरण मोहिमेत मनपा शाळा क्रमांक २८ मधील शिक्षकांनी मातापालक मेळावा घेऊन जनजागृती केली व सर्व विद्यार्थ्यांना लस देऊन मोहीम यशस्वी केली. याची दखल घेऊन मनपा आयुक्तांनी शिक्षकांचा विशेष गौरव केला. यावेळी शिक्षणाधीकारी उदय देवरे यांचे हस्ते शिक्षक सुरेश खांडबहाले यांना उत्कृष्ट कामाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सोनजी गवळी, कविता शिरोडे, वैभव आहिरे, रेगजी वसावे, भारती पवार, मंदाकिनी कटारे, सोनिया बोरसे, यशवंत जाधव, पुनाजी मुठे, सुरेश चौरे आदी उपस्थित होते.