गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By admin | Published: June 20, 2017 12:38 AM2017-06-20T00:38:21+5:302017-06-20T01:02:09+5:30
मनमाड : सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीेने शहरातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून ब्राईट स्पार्क स्कूलचे संस्थापक आशिष ललवाणी, वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, कल्पेश बेदमुथा, प्रदीप गुजराथी, बब्बु शेख, संचालक नरेश गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरातील आगामी पिढीला प्रेरणा मिळावी व गुणवंतांंच्या यशाचे कौतुक व्हावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे नितीन पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. इयत्ता बारावी मध्ये मनमाड केंद्रात प्रथम आलेल्या नाकिया बेहरनवाला (मरेमा विद्यालय), डिम्पल हिरालाल कौरानी (छत्रे न्यु इंग्लिश स्कुल), तर इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या कु.रितीका पाटील, द्वितीय आलेल्या आशुतोष सुधाकर कातकडे (छत्रे न्यु इंग्लिश स्कुल), तृतीय आलेल्या ऋतिका शेलार ,उज्ज्वल देसले ,आय.सी.एस.सी. बोर्डात मनमाड केंद्रात प्रथम आलेल्या अर्चीत गद्रे (गुड शेफर्ड इंग्लिश स्कुल) आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आशिष ललवाणी यांनी आपल्या मनोगतातून वाचनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी प्रकाश गाडगीळ क्रिडा शिक्षक प्रविण व्यवहारे , जगन्नाथ शेलार ,प्रविण खरोळे , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, निळकंठ त्रिभूवन, अंकुश जोशी, सतीशसिंह परदेशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्पेश बेदमुथा यांनी केले.