स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:50 PM2018-10-19T17:50:20+5:302018-10-19T17:53:44+5:30

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत सिन्नर नगरपरिषद आरोग्य विभाग व शुभ्रा आर्ट गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नर’ बनविण्यासाठी लोकसहभागातून घेण्यात आलेल्या रांगोळी, भिंती चित्र व पोस्टर्स स्पर्धां विजेत्या स्पर्धकांस प्रमाणपत्र व बक्षीस रक्कम देवून गौरविण्यात आले.

 The pride of the winners of the Clean Survey Competition | स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Next

अध्यक्षस्थानी आमदार राजाभाऊ वाजे बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, गटनेते हेमंत वाजे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहरातील विविध भागांत रांगोळी, भिंती चित्र व पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जवळपास ६५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. शहरात विविध ठिकाणी भिंंती चित्रे काढण्यात आली होती. भैरवनाथ मंदिर येथे रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर नगरपरिषदेच्या प्रांगणात पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या विद्यार्थी गट, व्यावसायिक गट असे प्रत्येक स्पर्धेत दोन गट तयार करण्यात येऊन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यात सिन्नरकर नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांच्या सहभागानेच सिन्नर शहर स्वच्छ होण्यास मदत झाली. स्वच्छ सिन्नर पुरस्कार प्राप्त होण्यात या सर्व नागरिकांचे व परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे श्रेय असल्याचे प्रतिपादन आमदार वाजे यांनी केले. नगराध्यक्ष डगळे यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक विजय जाधव, रामभाऊ लोणारे, सोमनाथ पावसे, श्रीकांत जाधव, मल्लू पाबळे, रूपेश मुठे, सुजाता भगत, ज्योती वामने, सुजाता तेलंग, प्रणाली गोळेसर, प्रतिभा नरोटे, मालती भोळे, शितल कानडी, नलिनी गाडे, गीता वरंदळ तसेच सहा. कार्यालय निरीक्षक विष्णू क्षत्रिय, नीलेश बाविस्कर, भीमराव संसारे, अनुप गुजराथी आदींसह अधिकारी कर्मचारी, स्पर्धक उपस्थित होते. शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी आभार मानले.

विजेते स्पर्धक : भित्ती चित्र स्पर्धा (विद्यार्थी) : दुर्गेश पठारे (प्रथम), सुजल काळे (द्वितीय), दिव्या सानप (तृत्तीय), प्रतिक जाधव, गायश्री मोरे (उत्तेजनार्थ). भित्ती चित्र व्यावसायिक स्पर्धा (विद्यार्थी) : भागवत क्षीरसागर (प्रथम), भारत थोेरात (द्वितीय), किशोर पठारे (तृत्तीय), गणेश तिडके, सोपान बोºहाडे (उत्तेजनार्थ) नितीन सगर (विशेष). पोस्टर स्पर्धा (विद्यार्थी) : गायश्री शिंदे (प्रथम), अभिजीत लांडगे (द्वितीय), चंचल काकड (तृत्तीय), श्रेयस बैरागी (चतुर्थ), विश्वजा काकुळते (पाचवी), मोक्षदा कुदळे, प्रसाद आव्हाड (उत्तेजनार्थ). पोस्टर स्पर्धा (व्यावसायिक) : शिवानी पवार (प्रथम), विराजीत पवार (द्वितीय), हरिश बेदडे (तृत्तीय). रांगोळी स्पर्धा गट १ (विद्यार्थी) : अंकुश तळेकर (प्रथम), साक्षी राठोड (द्वितीय), दिव्या सानप (तृत्तीय), अनिकेत क्षत्रिय, वैष्णवी गुजराथी (उत्तेजनार्थ), गट नं. २ : लक्ष्मी पाबळे व अश्विनी पाबळे (प्रथम), पूजा क्षत्रिय (द्वितीय), सपना बोºहाडे (तृत्तीय), उत्कर्षा आंबेकर, सलोनी वाळुंज (उत्तेजनार्थ), सचिन दोडके (विशेष). रांगोळी स्पर्धा (व्यावसायिक) : रेश्मा चोथवे (प्रथम), सोनाली गुजराथी (द्वितीय), विनायक गायकवाड (तृत्तीय), नीरजकुमार पंडीत, सिध्दी नवसे (उत्तेजनार्थ).चौकट- ३७ विजेत्या स्पर्धकांची निवडस्पर्धेत एकूण ३७ स्पर्धकांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम पारितोषक विजेत्यास ७५००, द्वितीय क्रमांकास ५,०००, तृतीय क्रमांकास तीन हजार, उत्तेजनार्थ १५०० व विशेष ५०० रु पये याप्रमाणे पारितोषक व प्रमाणपत्र देण्यात आले. परिक्षक म्हणून स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, रवींद्र देशमुख, परिश जुमनाके, हेमंत देवनपल्ली, राहुल मुळे, विनायक काकुळते, संजय क्षत्रिय, किशोर पगारे, क्षीरसागर आदींनी काम पाहिले.

Web Title:  The pride of the winners of the Clean Survey Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य