कन्यारत्न प्राप्त महिलांचा गौरव
By admin | Published: March 11, 2016 11:45 PM2016-03-11T23:45:51+5:302016-03-12T00:07:41+5:30
तेजस्विनी : जिल्हा रूग्णालयात सोहळा
नाशिक : जागतिक महिलादिनी कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांना ‘तेजस्विनी’ या सामाजिक संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. संस्थेने जिल्हा रुग्णालयात जाऊन तेथील २५ माता आणि त्यांच्या बाळांचा सन्मान केला.
तेजस्विनी महिला मार्गदर्शन व विकास केंद्राच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात ‘बेटी बचाव’ अभियानाचा संदेश देण्यात आला असे संस्थेच्या अध्यक्ष साधना तोरणे यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. वसुंधरा राणे यांनी बाळाची काळजी आणि मातांचा आहार याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या सरचिटणीस रुपाली तोरष यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अंजली देशमुख यांनी मानले.
यावेळी स्मिता देशमुख, संगीता भावसार, लता देशमुख, अर्चना नितनवरे, आशा पाटील, रेखा गाडेकर, रत्ना सनेर, ज्योती बैरागी,
रंजना देशपांडे, रंजना देशमुख, मीना चव्हाण उपस्थित होते.
(प्रतिनिधी)