प्रीमिअमप्रश्नी क्रेडाईचे पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:57 PM2017-10-17T23:57:26+5:302017-10-18T00:12:31+5:30

महापालिका आयुक्तांनी इमारत बांधकामासाठी प्रीमिअमच्या दरात ७० ते ८० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविल्यानंतर सदरचा प्रस्ताव शासनाने मंजूर करू नये, या मागणीसाठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईसह आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी (दि. १७) पालकमंत्री गिरीश महाजन यांना साकडे घातले. सदर शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले.

 Prima facie Credai's Guardian Minister | प्रीमिअमप्रश्नी क्रेडाईचे पालकमंत्र्यांना साकडे

प्रीमिअमप्रश्नी क्रेडाईचे पालकमंत्र्यांना साकडे

Next

नाशिक : महापालिका आयुक्तांनी इमारत बांधकामासाठी प्रीमिअमच्या दरात ७० ते ८० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविल्यानंतर सदरचा प्रस्ताव शासनाने मंजूर करू नये, या मागणीसाठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईसह आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी (दि. १७) पालकमंत्री गिरीश महाजन यांना साकडे घातले. सदर शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले.  महापालिका आयुक्तांनी प्रीमिअमच्या दरात ८० टक्क्यांपर्यंत वाढ सुचविणारा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविल्यानंतर त्याचे बांधकाम व्यावसायिकांसह शेतकरी वर्गात तीव्र पडसाद उमटत आहेत. क्रेडाईसह आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी प्रीमिअम दरवाढीला तीव्र विरोध दर्शविला आहे तर शेतकरी वर्गाने सदर दरवाढीचे समर्थन करत ती रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यातच आमदार बाळासाहेब सानप, आमदार जयंत जाधव यांनीही या प्रकरणात उडी घेत दरवाढीला विरोध दर्शविला आहे. मंगळवारी (दि.१७) नाशिक दौºयावर आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली. या शिष्टमंडळात क्रेडाईसह आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळाने प्रीमिअम दरवाढीमुळे ग्राहकांचेच नुकसान होणार असून, घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याचे स्पष्ट केले. आधीच शहरात बांधकाम व्यवसाय मंदीच्या कठीण काळातून मार्गक्रमण करतो आहे. त्यात ही दरवाढ झाल्यास व्यवसाय पूर्ण ठप्प होण्याची भीतीही शिष्टमंडळाने बोलून दाखविली. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी याप्रकरणी सांगोपांग विचार करून आणि क्रेडाईशी चर्चा करूनच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Web Title:  Prima facie Credai's Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.