वादळी वाऱ्यामुळे उडाले भावडे प्राथमिक शाळेचे पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 09:53 PM2019-04-15T21:53:31+5:302019-04-15T21:55:51+5:30
खर्डे : रविवारी (दि.१४) रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाºयाने भावडे (ता.देवळा) येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
खर्डे : रविवारी (दि.१४) रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाºयाने भावडे (ता.देवळा) येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
देवळा-नाशिक रस्त्यालगत मोरेवस्तीवर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथील दोन वर्गखोल्यांचे निम्म्या बाजूचे पत्रे उडून बाजूस पडले आहेत. सुदैवाने ही घटना रात्री १० वाजेच्या सुमारास झाल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
या ठिकाणी मतदान केंद्र असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शाळेचे पत्रे उडाल्याने प्रशासनाने या घटनेची तात्काळ नोंद घेत सर्व यंत्रणा कामास लावली आहे.
चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी फोनवरून या घटनेची चौकशी करून तात्काळ शाळा दुरु ती करावी असे आदेश दिले आहेत.
तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, गटविकास अधिकारी महेश पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी विजया फलके, केंद्र प्रमुख संजय ब्राह्मणकार आदींनी शाळेत जाऊन नुकसानीची पाहणी केली. तलाठी श्रीमती साळवे, ग्रामसेवक वासंती देसले यांनी घटनेचा पंचनामा केला. शाखा अभियंता आर. बी. चव्हाण यांनी दुरु स्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून घेतले व ग्रामपंचायत स्तरावरून येत्या दोन तीन दिवसात वर्गखोल्या दुरु स्त करून देऊ असे उपस्थित पालकांना सांगितले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब भदाणे, विनायक मोरे, पोलीस पाटील विष्णू साबळे, कैलास आहेर, राकेश गुंजाळ, किशोर पाटील, सागर मोरे, नितीन मोरे, मेहुल मोरे, अशोक मोरे, किरण भदाणे आदी उपस्थित होते.