प्राथमिक शिक्षिका ते उपमहापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:56 AM2019-11-23T00:56:14+5:302019-11-23T00:57:05+5:30

वय ८३ वर्षे, शिक्षण जुनी सातवी पास. आजही प्रभागात पायी चालत नागरिकांना पाणी येते का, पथदीप चालू आहे का? तुमच्याकडे साफसफाई करायला मनपा कर्मचारी येता का? असे नानाविध प्रश्न विचारून प्रभागातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भिकूबाई बागुल नाशिक महापालिकेच्या उपमहापौर झाल्याने रामवाडी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 Primary Teacher to Deputy Mayor | प्राथमिक शिक्षिका ते उपमहापौर

प्राथमिक शिक्षिका ते उपमहापौर

Next

वय ८३ वर्षे, शिक्षण जुनी सातवी पास. आजही प्रभागात पायी चालत नागरिकांना पाणी येते का, पथदीप चालू आहे का? तुमच्याकडे साफसफाई करायला मनपा कर्मचारी येता का? असे नानाविध प्रश्न विचारून प्रभागातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भिकूबाई बागुल नाशिक महापालिकेच्या उपमहापौर झाल्याने रामवाडी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भिकूबाई बागुल यांचे कुटुंब मूळचे दिंडोरी तालुक्यातील वणी गावचे. केवळ मुलांच्या शिक्षणासाठी पतीचा विरोध झुगारून त्यावेळी भिकुबाई बागुल यांनी नाशिक शहर गाठले. लग्नापूर्वी शिक्षिका असल्याने मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना मोठे करायचे असा चंग त्यांनी बांधला. नाशिकला आले त्यावेळी मुलगे मनोहर, स्व. दिलीप, सुनील, संजय, मुली तारा, ज्योती असे सर्वजण होते. भिकूबार्इंचे पती किसनराव बागुल भारतीय सैन्यात होते. त्यांनी १९६५ व १९७२च्या लढाईत भाग घेतला होता. १९७५ला त्यांचे निधन झाले. त्यावेळी मुलांच्या संगोपनाची जबाबदारी भिकूबाई यांच्यावर आली. त्यांनी सर्व मुलांचा सांभाळ केला. शिक्षित असल्यामुळे परिसरातील महिला, पुरुष सल्ला व मदतीसाठी भिकूबार्इंकडे येत असत. शेवटी जनतेनेच त्यांना ‘मावशी’ या नावाने संबोधण्यास सुरुवात केली. भिकूबाई यांचा मुलगा सुनील त्यावेळी राजकारणात असल्याने त्यांना सुरुवातीपासून समाजसेवेची आवड होती. १९९२ मध्ये महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळी भिकूबाई शिवसेनेकडून निवडून आल्या. त्यानंतर २००२ मध्ये प्रभाग रचनेत त्रिसदस्यीय पॅनलमध्ये पुन्हा त्या निवडून आल्या. त्यांचा धाकटा मुलगा संजय बागुल हादेखील नगरसेवक म्हणून निवडून आला होता. नुकत्याच झालेल्या २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली त्यात त्या विजयी झाल्या.
वयाची तमा न बाळगता सर्वांच्या बरोबरीने इतरांना लाजवेल असेच काहीसे काम भिकूबाई करीत आहेत. त्या आजही मोबाइल वापरत नाहीत. प्रभागातील रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत समस्या भेडसावल्या तर त्या स्वत: मुलांकडून अर्ज करून घेतात. पाठपुरावा करण्यासाठी महापालिकेत पाठवतात.
आई उपमहापौर झाली याचा खूप आनंद झाला आहे. भारतीय जनता पक्षाने प्रामाणिकपणे उमेदवारी दिली. त्यामुळे आईला उपमहापौर होण्याची संधी मिळाली. म्हटले तर निवडणूक खूप अवघड होती. परंतु सर्वांचे सहकार्य लाभले आणि पक्षात प्रामाणिकपणे काम करणाºया माणसाला संधी दिली आहे. आईने केलेल्या कामाची पावती पक्षाने दिली.
- संजय बागुल, मुलगा

Web Title:  Primary Teacher to Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.