राष्ट्रीय पेन्शन योजनेला प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:01+5:302021-01-17T04:14:01+5:30

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक भा.वा. शिंपी गुरुजी यांनी १९७७ च्या ५४ दिवसांच्या राज्य कर्मचाऱ्यांच्या संपात शिक्षकांना ...

Primary Teachers' Committee opposes National Pension Scheme | राष्ट्रीय पेन्शन योजनेला प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध

राष्ट्रीय पेन्शन योजनेला प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध

googlenewsNext

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक भा.वा. शिंपी गुरुजी यांनी १९७७ च्या ५४ दिवसांच्या राज्य कर्मचाऱ्यांच्या संपात शिक्षकांना पेन्शन व अन्य भत्ते मिळण्यासाठी लाखो शिक्षकांसह सहभाग घेतला होता. भा.वा. शिंपी गुरुजींचा स्मृतिदिन पेन्शन हक्क निर्धार दिन म्हणून पाळत असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यात १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक, कर्मचारी यांना सध्या लागू असलेली परिभाषित अंशदान पेन्शन योजना तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून प्रचलित जुनी पेन्शन योजना आणि भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी अशा आशयाचे निवेदन संपूर्ण राज्यात जिल्हा, तालुका पातळीवर देण्यात आले. नाशिक येथे निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी राज्य पदाधिकारी भामरे, जिल्हा नेते प्रकाश आहिरे, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष साहेबराव पवार, जिल्हा कोषाध्यक्ष नितीन देवरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद निकम, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत वाघ, तालुकाध्यक्ष सचिन कापडणीस, तालुका सरचिटणीस सुनील सांगळे, मनपा नाशिक समिती अध्यक्ष विठ्ठल नागरे, सरचिटणीस पद्दमाकर बागड, कार्याध्यक्ष साहेबराव बागड, कोषाध्यक्ष प्रमोद पाटील आदींसह शिक्षक समिती पदाधिकारी उपस्थित होते. (फोटो १६ टिचर)

Web Title: Primary Teachers' Committee opposes National Pension Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.