कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचविले काळविटाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:16 PM2018-08-10T14:16:39+5:302018-08-10T14:17:26+5:30
जळगाव नेऊर : अन्नपाण्याच्या शोधात असलेल्या काळविटाला नागरिकांनी कुत्र्यांच्या हल्यातुन सुटका करून जीवदान दिले आहे.
जळगाव नेऊर : अन्नपाण्याच्या शोधात असलेल्या काळविटाला नागरिकांनी कुत्र्यांच्या हल्यातुन सुटका करून जीवदान दिले आहे. पिंपळगाव लेप येथील शेतकरी चंद्रभान दौंडे यांच्या शेतात नर जातीचे काळवीट नजरेस आले. या काळवीटाच्या पाठीमागे पळून नऊ-दहा मोकाट कुत्रे पाठलाग करत भुंकत होते, आपला जीव वाचविण्यासाठी काळवीट पळत होते. परंतु दौंडे यांनी हे दृश्य बघितल्याने कुत्र्यांनपासुन सुटका करून काळविटाला पाणी पाजले व खाण्यासाठी चारा दिला. आपल्या शेतात दोरीने बांधत वनविभागाला बोलावून घेतले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी संजय भंडारी यांच्या आदेशानुसार वनसेवक रामचंद्र गंडे, विलास देशमुख, अब्दुल शेख यांनी ताबडतोब भेट देऊन नर जातीचे काळवीट ताब्यात घेतले. त्यामुळे ग्रामस्थांच्या सतर्कतेने काळवीटाला जीवदान मिळाले आहे. यावेळी सरपंच दिंगबर दौंडे, माणिक रसाळ,गणपत काळे, माणिक दौंडे,अशोक दौंडे,अनिल बिडवे, आप्पा दौंडे,रविंद्र दौंडे,दत्तु डगळे,विजय दौंडे,चंद्रभान दौंडे आदी उपस्थित होते.