राजेंद्र जाधव यांच्या संशोधनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:03 AM2020-06-01T00:03:34+5:302020-06-01T00:03:40+5:30

सटाणा : ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सॅनिटायझर फवारणी यंत्र निर्मितीच्या वृत्तामुळे ’मन की बात’मध्ये कौतुक सटाणा / औंदाणे : बागलाण ...

Prime Minister Modi notices Rajendra Jadhav's research | राजेंद्र जाधव यांच्या संशोधनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून दखल

राजेंद्र जाधव यांच्या संशोधनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून दखल

googlenewsNext

सटाणा : ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सॅनिटायझर फवारणी यंत्र निर्मितीच्या वृत्तामुळे ’मन की बात’मध्ये कौतुक
सटाणा / औंदाणे : बागलाण तालुक्यातील व्यावसायिक व संशोधक राजेंद्र जाधव यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनोखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या
यंत्राची कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत होत आहे. या उल्लेखनीय निर्मितीकार्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात विशेष कौतुकोद्गार काढून जाधव यांचा गौरव केला आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी ‘मेक इन इंडिया’अंतर्गत संशोधित सॅनिटायझर मशीनमुळे कोरोना उच्चाटनाच्या युद्धात मोठे बळ मिळाले आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते संशोधक राजेंद्र जाधव यांच्या या संशोधनामुळे नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये दि. ४ मे रोजी ‘सॅनिटायझर फवारणी यंत्राची निर्मिती’ हे वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात जाधव यांच्या संशोधनाचे कौतुक केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि पोलीस यंत्रणेकडून कोरोनाविरोधात लढा सुरू आहे. असे असले तरी रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कम्पाउंड गेट, भिंती आदींना माणसांचा
स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही मार्गाने स्पर्श होणाऱ्या विविध जागांवर निर्जंतुकीकरण करून संसर्ग टाळणे शक्य आहे. हे आव्हानात्मक काम मनुष्यबळाची कमतरता असल्याने पूर्ण क्षमतेने होताना दिसून येत नाही. मात्र मनुष्यबळाचा वापर न करता झपाट्याने फैलावत असणाºया कोरोनावर मात करण्यासाठी संभाव्य संसर्गित जागांची तातडीने फवारणी करणे अत्यावश्यक ठरते. बागलाण तालुक्यातील दºहाणे येथील शेतकरी, संशोधक राजेंद्र जाधव यांनी त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणीसाठी यंत्र निर्मित केले होते. त्या यंत्राची उपयुक्तता तपासून कोरोना संकटकाळात त्यांनी हे यंत्र सटाणा पालिकेला वापरासाठी दिले.
आरोग्य खात्याच्या मानकाप्रमाणे या यंत्रामुळे कोरोना निर्जंतुकीकरणाच्या लढाईला बळ मिळाले. कोरोना संसर्गाच्या कठीण परिस्थितीत सॅनिटायझेशनसाठी या यंत्रामुळे आत्मनिर्भरतेची शिकवण मिळाली. त्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी योगदान ठरलेल्या यंत्राची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

अशी झाली यंत्राची निर्मिती
अभियांत्रिकीत शिक्षण झालेले राजेंद्र जाधव यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणांचीची स्वच्छता करण्यासाठी स्व-अध्ययनातून एक यंत्र विकसित करता येईल का, याविषयी संशोधन सुरू केले. यासाठी त्यांनी शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणाºया यंत्रसामग्रीचा प्राधान्याने वापर केला. अवघ्या पंचवीस दिवसांमध्ये जाधव यांनी ट्रॅक्टरवर बसवता येऊ शकेल, असे नावीन्यपूर्ण फवारणी यंत्र विकसित केले. या यंत्राच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर रस्ते, सोसायट्या, दारे, कुंपणाच्या भिंती अगदी स्वच्छ धुऊन काढणे शक्य होत आहे.

असा होतो उपयोग...
या यंत्रामध्ये एकमेकांच्या विरु द्ध दिशेला अ‍ॅल्युमिनिअमची दोन पाती बसवण्यात आली आहेत. दोन्ही पाती विरु द्ध दिशेने हवा शोषून घेतात व नोझल (छिद्र)मधून उच्चदाबाने निर्जंतुकीकरणाच्या द्रावाच्या तुषारांचे सिंचन सर्व दिशांना करतात. ही पाती १८० अंशाच्या कोनामध्ये फिरतात. तसेच जमिनीपासून १५ फूट उंचीपर्यंतच्या भिंतीचीही स्वच्छता करण्यास ती सक्षम आहेत. या यंत्राद्वारे स्वच्छता, निर्जंतुकीकरणासाठी पंधरा अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ शकतो. या स्वच्छता यंत्रामध्ये एकावेळेस सहाशे लिटर जंतुनाशक मिश्रित द्रावण भरण्याची सुविधा आहे. या कामामध्ये मानवी हस्तक्षेपाची फार कमी आवश्यकता भासते. त्यामुळे विषाणूंचा मानवाशी संपर्क येण्याची शक्यता खूप कमी आहे. फक्त एकच व्यक्ती म्हणजे, जी ट्रॅक्टर चालक आहे, ती व्यक्ती हे यंत्र संचलित करून संपूर्ण गावाची स्वच्छता करू शकते.

यंत्राच्या विकासासाठी सुमारे १.७५ लाख रुपये खर्च आला आहे. या यंत्राचा वापर सटाणा पालिकेच्या वतीने सटाणा गावात जवळपास ३० किलोमीटर क्षेत्रामध्ये स्वच्छता करण्यासाठी केला जात आहे. कोरोनावर विजय मिळवून देणारे हे अभिनव फवारणी यंत्र असल्याने या यंत्राला ’यशवंत’ असे नाव दिले आहे. या अनोख्या फवारणी यंत्राच्या पेटंटसाठी म्हणजेच बौद्धिक स्वामित्वासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच (एनआयएफ) नॅशनल इनोव्हेशन फाउण्डेशनकडेही त्याचे डिझाईन पाठवले आहे.
- राजेंद्र जाधव , संशोधक

Web Title: Prime Minister Modi notices Rajendra Jadhav's research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.