मनीआॅर्डर पाठविणाऱ्या शेतक-याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:16 AM2018-12-05T05:16:47+5:302018-12-05T05:16:53+5:30
कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतक-यांच्या व्यथांकडे लक्ष वेधणा-या निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतक-याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली.
लासलगाव (जि. नाशिक) : कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतक-यांच्या व्यथांकडे लक्ष वेधणा-या निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतक-याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली. त्यानुसार, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी या शेतकºयाची विचारपूस करत त्याची स्थिती जाणून घेतली.
राज्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होईल, असे गृहीत धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकºयांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता. दोन एकर शेती असलेले निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी १ एकर शेतात द्राक्ष बाग लावली आहे तर उर्वरीत एक एकर क्षेत्रात डिसेंबर २०१७ रोजी उन्हाळ कांद्याचे पीक घेतले होते. साठे यांना उन्हाळ कांद्याचे ४५ ते ५० क्विंटल उत्पादन झाले. त्यासाठी त्यांना ५० हजार रु पयांच्या जवळपास खर्च आला. साठे यांनी त्यातील साडेसात क्विंटल कांदा लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात विक्र ी केला असता त्याला १५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यातून उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्चही वसूल होणार नाही.
>अनोखे आंदोलन
साठे यांनी शेतकºयांच्या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी कांदा विक्रीतून मिळालेले १,०६४ रुपये आणि त्यात स्वत:चे ५४ रुपये घालून १११८ रुपयांची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मनीआॅर्डरने पाठवून दिली होती. साठे यांच्या या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली.