मनीआॅर्डर पाठविणाऱ्या नैताळेच्या कांदा उत्पादक शेतकºयाची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 01:31 AM2018-12-05T01:31:37+5:302018-12-05T01:32:58+5:30
लासलगाव : कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधणाºया निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. त्यानुसार, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सदर शेतकºयाची विचारपूस करत त्याची स्थिती जाणून घेतली.
लासलगाव : कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधणाºया निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. त्यानुसार, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सदर शेतकºयाची विचारपूस करत त्याची स्थिती जाणून घेतली.
राज्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होईल, असे गृहीत धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकºयांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता. दोन एकर शेती असलेले निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी १ एकर शेतात द्राक्ष बाग लावली आहे तर उर्वरीत एक एकर क्षेत्रात गेल्या वर्षातील डिसेंबर महिन्यात उन्हाळ कांद्याचे पीक घेतले होते. साठे यांना उन्हाळ कांद्याचे ४५ ते ५० क्विंटल उत्पादन झाले. त्यासाठी त्यांना ५० हजार रु पयांच्या जवळपास खर्च आला. साठे यांनी त्यातील साडेसात क्विंटल कांदा लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात विक्र ी केला असता त्याला १५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यातून उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्चही वसूल होणार नसल्याने साठे यांनी शेतकºयांच्या या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी कांदा विक्रीतून मिळालेले १०६४ रुपये आणि त्यात स्वत:चे ५४ रुपये घालून १११८ रुपयांची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मनीआॅर्डरने पाठवून दिली होती.
साठे यांच्या या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली. अखेर त्याची पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने दखल घेण्यात आली असून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.कांदा स्थितीची मागविली माहिती
दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाला मनीआॅर्डरचे पैसे मिळताच त्यांनी त्याची तातडीने दखल घेत राज्य सरकारकडे वस्तुस्थितीची विचारणा करणारे पत्र पाठविले. त्यावरून राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र, झालेले उत्पादन, कांदा लागवडीसाठी येणारा खर्च, सध्या मिळणारा भाव, भाव कमी मिळण्याची कारणे अशी सर्व माहिती तत्काळ पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन मार्केट कमिट्यांकडून माहिती गोळा करीत असून, कांद्याचे दर कोसळण्याची कारणे व शेतकºयांकडे शिल्लक असलेला कांदा शोधण्याचे काम सुरू आहे. पुढच्या आठवड्यात या संदर्भातील माहिती राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे.उपजिल्हाधिकारी यांच्याकडून चौकशी
थेट पंतप्रधानांना मनिआॅर्डर पाठविणाºया संजय साठे या शेतकºयाची उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरु ळे यांनी सोमवारी रात्री भेट घेऊन त्यांना कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची चौकशी केली. याचबरोबर साठे यांना काही राजकीय पाठिंबा आहे काय किंवा त्यांच्याकडून राजकीय भांडवल केले जाते आहे काय, याची खात्री करण्यासाठी नैताळे येथील माजी सरपंच व माध्यमांच्या प्रतिनिधींकडेही साठे यांची चौकशी करण्यात आली.