भद्रकालीतील व्हिडीओ पार्लरवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 04:41 PM2018-08-31T16:41:28+5:302018-08-31T16:42:20+5:30
नाशिक : भद्रकाली परिसरातील रेडलाईट परिसरातील व्हिडीओ पार्लरवर गुरुवारी (दि़३०) पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अश्लिल चित्रपट दाखविणाऱ्या एका व्हिडीओ चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : भद्रकाली परिसरातील रेडलाईट परिसरातील व्हिडीओ पार्लरवर गुरुवारी (दि़३०) पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अश्लिल चित्रपट दाखविणाऱ्या एका व्हिडीओ चालकाविरू ध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
साईराज व्हिडीओ पार्लरमध्ये अश्लिल चित्रपट दाखविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता व्हिडीओ हॉलमध्ये बेकायदेशीर अश्लिल चित्रपट सुरू होता. याप्रकरणी व्हिडीओ चालक निहाल गुलाब सय्यद (रा.काझीगडी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडकोत वृक्षांची अवैध कत्तल
नाशिक : सिडकोतील दिव्या अॅडलॅब्ज व लक्ष्मी मंगल कार्यालयातील विविध प्रजातींची सात झाडांची अवैध कत्तल केल्याची घटना घडली आहे़ हिरावाडी येथील प्रकाश चौकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिडकोच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये असलेल्या पाटीलनगरमधील मृत्युंजय महादेव मंदिराच्या बाजूच्या आवारातील काशिद , गुलमोहर, रेन ट्री, आंबा व नारळ या झाडांची कत्तल करण्यात आली आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदूरनाक्यावरील इसमाची आत्महत्या
नाशिक : पाठीच्या व मणक्याच्या सततच्या आजारपणास कंटाळलेल्या ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ ३०) औरंगाबाद रोडवरील नांदूर नाक्यावर असलेल्या गणपतनगरमध्ये घडली़ दिलीप शिवराम गायकवाड (रा. कापसे गल्ली, गणपतनगर, नांदूर नाका) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप गायकवाड यांनी घरातील छताच्या अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ पोलिसांनी गायकवाड यांची झडती घेतली असता त्यांच्या टी-शर्टच्या खिशात चिठ्ठी आढळून आली़ या चिठ्ठीमध्ये त्यांनी पाठीच्या व मणक्याच्या तसेच इतर आजारांना कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. मी स्वत:हून आत्महत्या करीत असून, कोणासही जबाबदार धरू नये, असेही त्या चिठ्ठीत नमूद केले आहे.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़