आडगाव पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:41 AM2018-06-14T00:41:53+5:302018-06-14T00:41:53+5:30
आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़१२) रात्री छापा टाकला़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित चैताली रामदास अहेर (३५, संजयनगर, वाघाडी) या कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस अटक केली असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पंचवटी : आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़१२) रात्री छापा टाकला़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित चैताली रामदास अहेर (३५, संजयनगर, वाघाडी) या कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस अटक केली असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित चैताली अहेर ही गत काही दिवसांपासून मातोश्री रो-हाउस नंबर तीनमध्ये काही पीडित महिलांकडून इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि.१२) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक योगीता जाधव यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन तसेच बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व त्यानंतर कारवाई केली. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, संशयित चैताली अहेर विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़