गोविंदनगरमधील कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:16 AM2018-12-15T01:16:45+5:302018-12-15T01:16:58+5:30

गोविंदनगर परिसरात लघुउद्योगाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर मुंबई नाका पोलिसांनी शुक्रवारी (दि़१४) दुपारी छापा टाकला़ या कुंटणखान्यातून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, संशयित संतोष मोरे (रा. कृष्णकुंज सोसायटी, गोंविंदनगर) व त्याच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे़

Print on Gavinandagar Shrine | गोविंदनगरमधील कुंटणखान्यावर छापा

गोविंदनगरमधील कुंटणखान्यावर छापा

Next
ठळक मुद्देतीन महिलांची सुटका : दाम्पत्यास अटक

नाशिक : गोविंदनगर परिसरात लघुउद्योगाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर मुंबई नाका पोलिसांनी शुक्रवारी (दि़१४) दुपारी छापा टाकला़ या कुंटणखान्यातून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, संशयित संतोष मोरे (रा. कृष्णकुंज सोसायटी, गोंविंदनगर) व त्याच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे़ या दोघांवरही पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गोविंदनगर परिसरातील कृष्णकुंज सोसायटीत बॅग बनविण्याच्या नावाखाली महिलांना कामास ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने देहविक्रय करून घेतला जात असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळे यांना मिळाली होती़ त्यानुसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास सहायक पोलीस आयुक्त आऱ आऱ पाटील यांच्यासह मुंबई नाका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बनावट गिºहाईक पाठवून खात्री केल्यानंतर छापा टाकला़

गुन्हा दाखल
पोलिसांनी या ठिकाणाहून तीन महिलांची सुटका केली असून, कुंटणखाना चालविणारी महिला व पुरुषास ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Print on Gavinandagar Shrine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.