प्लॅस्टिक बॅग तयार करणाऱ्या कंपनीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:48 AM2019-08-31T00:48:13+5:302019-08-31T00:48:45+5:30
मनपा नाशिकरोड घनकचरा विभाग व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे अंबड एमआयडीसीतील प्लॅस्टिकच्या नॉन ओवन बॅग तयार करणाºया साई प्रॉड््क्ट कंपनीवर छापा मारून सुमारे चार टन प्लॅस्टिकच्या बॅगा जप्त करून कंपनीला सील केले.
नाशिकरोड : मनपा नाशिकरोड घनकचरा विभाग व महाराष्टप्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे अंबड एमआयडीसीतील प्लॅस्टिकच्या नॉन ओवन बॅग तयार करणाºया साई प्रॉड््क्ट कंपनीवर छापा मारून सुमारे चार टन प्लॅस्टिकच्या बॅगा जप्त करून कंपनीला सील केले.
नाशिकरोड परिसरात प्लॅस्टिक पिशवी बंदी कारवाई करण्यात येत होती. यावेळी बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार करून त्यांचे वाटप व्यावसायिकांना करणाºया अंबड एमआयडीसीतील साई प्रॉड््क्ट या कंपनीची माहिती मिळाली. त्यानुसार मनपा नाशिकरोड घनकचरा विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करीत अंबड एमआयडीसीतील संदीप घुमरे यांच्या साई प्रॉड््क्ट या कंपनीवर छापा मारून त्या ठिकाणी सुमारे चार टन बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या बॅगा जप्त करून कंपनीला सील केले. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मनपा नाशिकरोड विभागीय अधिकारी नितीन नेर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक विजय जाधव आदींनी केली.