महसूल यंत्रणेचा मटका अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:56+5:302021-05-20T04:14:56+5:30

सिन्नर : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरु असताना शहरातील सातपीर गल्लीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवून अवैधरित्या ...

Print the revenue system on the pot stand | महसूल यंत्रणेचा मटका अड्डयावर छापा

महसूल यंत्रणेचा मटका अड्डयावर छापा

Next

सिन्नर : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरु असताना शहरातील सातपीर गल्लीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवून अवैधरित्या सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर महसूलच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. घटनास्थळी पोलीस नसल्याने प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरासह तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असल्याने कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. पोलिसांसोबतच महसूल विभाग व प्रशासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहे. मंगळवारी महसूल विभागातील एक तलाठी, महिला तलाठी व कर्मचारी शहरातून गस्त घालत असताना सातपीर गल्लीत पाराजवळ काही तरुण आढळून आले. पथकाने त्यांच्याजवळ जात चौकशी सुरू केली. त्यावेळी येथे असलेल्या मटका अड्ड्यात पळापळ सुरू झाली. पथकाचा संशय बळावल्याने कर्मचार्‍यांनी आत जाऊन पाहिले असता अनेकजण जण मटका खेळताना आढळून आले. विशेष म्हणजे यात महिलांचाही सहभाग होता. या पथकाने सिन्नर पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली असता त्यांनी जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. या पथकाने २० ते २५ हजारांची रोकड, मटका खेळण्यासाठी वापरल्या जाणार्‍या चिठ्ठ्या जप्त करुन मटका अड्डा चालकाला पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली.

------------

सिन्नर येथे महसूल विभागाने छापा टाकून कोरोना लॉकडाऊनच्या काळात मटका अड्डा चालवणाऱ्यावर कारवाई केली. (१९ सिन्नर १)

===Photopath===

190521\19nsk_6_19052021_13.jpg

===Caption===

१९ सिन्नर १

Web Title: Print the revenue system on the pot stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.