मखमलाबादला अनधिकृत बार, हुक्का पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:14 AM2020-02-29T00:14:42+5:302020-02-29T00:15:35+5:30

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद शिवारात असलेल्या हॉटेल बार ओ बार याठिकाणी चालणाऱ्या अनधिकृत देशी व विदेशी मद्यविक्रीवर तसेच हुक्का पार्लरवर अवैध धंदे पथकाने शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी धापा टाकून सुमारे ५२ हजारांचा माल जप्त केला तसेच हॉटेल व्यवस्थापक, हुक्का पार्लरचे मालक, भागीदार अशा सहा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Print unauthorized bar, hookah parlor in velvet | मखमलाबादला अनधिकृत बार, हुक्का पार्लरवर छापा

मखमलाबादला अनधिकृत बार, हुक्का पार्लरवर छापा

Next

पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद शिवारात असलेल्या हॉटेल बार ओ बार याठिकाणी चालणाऱ्या अनधिकृत देशी व विदेशी मद्यविक्रीवर तसेच हुक्का पार्लरवर अवैध धंदे पथकाने शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी धापा टाकून सुमारे ५२ हजारांचा माल जप्त केला तसेच हॉटेल व्यवस्थापक, हुक्का पार्लरचे मालक, भागीदार अशा सहा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
म्हसरूळ शिवारात असलेल्या मखमलाबाद परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बार ओ बार याठिकाणी अनधिकृतपणे मद्यसाठा करून विक्री केली जाते तसेच अवैधरीत्या हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी निर्माण केलेल्या अवैध धंदे विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकातील कर्मचारी गोपनीय पद्धतीने माहिती काढून खात्री केली असता सदर हॉटेलात मद्यविक्री व हुक्का पार्लर चालत असल्याचे स्पष्ट
झाले.
त्यानुसार पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांच्यासह पोलीस पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी खुलेआमपणे देशी-विदेशीमध्ये विक्री केली जात असल्याचे व अनधिकृतपणे हुक्का पार्लर चालविले जात असल्याचे निष्पन्न
झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून देशी-विदेशी मद्यसाठा व हुक्का असा जवळपास ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनधिकृत मद्यसाठा करणाºया व हुक्का पार्लर चालविणाºया संशयित आरोपी मनीष लोखंडे (रा.राणेनगर), कुणाल विसपुते (सिडको), राजा अरोरा (देवळाली कॅम्प), आकाश सूर्यवंशी (उदय कॉलनी मखमलाबादरोड), विजय भाटिया, अमर जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Print unauthorized bar, hookah parlor in velvet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.