वणीला मटका अड्ड्यावर छापा; चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 10:36 PM2020-03-04T22:36:47+5:302020-03-04T22:37:31+5:30
वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणी- पिंपळगाव रस्त्यावरील टाइम मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून चार संशयितांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १० हजार ३६० रु पयांचा ऐवजही जप्त करण्यात आला.
वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणी- पिंपळगाव रस्त्यावरील टाइम मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून चार संशयितांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १० हजार ३६० रु पयांचा ऐवजही जप्त करण्यात आला.
दुसऱ्या एका घटनेत अवनखेड परिसरात बेकायदेशीर देशी व विदेशी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे व पथकाने पाळत ठेवली. त्यादरम्यान संशयित जीप (क्र.एमएच १५ एएच १६७६) जात असताना पथकाने ते अडवले. त्या वाहनाची तपासणी केली असता १ लाख ४८ हजार ४४० रु पयांचे मद्य व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा २ लाख ९८ हजार ४४० रु पयांचा ऐवज जप्त करण्यात आला असुन कचरु बबन सोणवणे (रा. शिवाजीनगर, दिंडोरी) रतन रामा गुंबाडे (रा. पिंपळगाव धूम) यांना अटक करण्यात आली आहे.