नोटांच्या छपाईचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:01 AM2018-05-12T01:01:49+5:302018-05-12T01:01:49+5:30

नोटाटंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी करन्सी नोट प्रेसमध्ये सुरू असलेल्या नोटा छपाईला वेग देण्याचे आदेश देण्यात आले असून, आता नोटा छपाईचा वेग ४० टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. यामुळे दररोज एक कोटी नोटा छपाईचा वेग आता १.४ कोटी नोटा इतका करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये छापलेल्या ५०० रुपयांच्या आठ कोटी नोटा रिझर्व्ह बँकेकडे सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 The printing speed increased | नोटांच्या छपाईचा वेग वाढला

नोटांच्या छपाईचा वेग वाढला

Next

नाशिक : नोटाटंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी करन्सी नोट प्रेसमध्ये सुरू असलेल्या नोटा छपाईला वेग देण्याचे आदेश देण्यात आले असून, आता नोटा छपाईचा वेग ४० टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. यामुळे दररोज एक कोटी नोटा छपाईचा वेग आता १.४ कोटी नोटा इतका करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये छापलेल्या ५०० रुपयांच्या आठ कोटी नोटा रिझर्व्ह बँकेकडे सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकरोडच्या प्रेसमध्ये ५० आणि ५०० रुपयांच्या नोटांचीच छपाई सुरू आहे.  सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रेस महामंडळाच्या नाशिकरोड, देवास येथे नोट प्रेस आहेत. रिझर्व्ह बॅँंकेने स्वत:चे नोटांचे कारखाने सुरू केले आहेत. ते कर्नाटकातील म्हैसूर आणि बंगालमधील सालगोणी येथे आहेत. देशात फक्त या चार ठिकाणी नोटांची छपाई केली जाते. या सर्व प्रेसमध्ये मिळून पाचशे रुपयांच्या नोटांचे उत्पादन पाचपटीने वाढविण्याचे आदेश आहेत. म्हणजेच दिवसाला अडीच हजार कोटी नोटा छापल्या जाणार आहेत. पाचशेच्या नोटांचे उत्पादन वाढविण्याचे निर्देश नाशिकरोड प्रेसला मिळाले आहेत. पाचशेची नवी आर्डर रिझर्व्ह बॅँकेकडून मिळाल्याने गेल्यावर्षी पाचशेच्या नोटांची छपाई थांबली होती. ती एप्रिलच्या मध्याला पुन्हा सुरू झाली. पाचशेच्या ८० दशलक्ष नोटा रिझर्व्ह बॅँकेला गेल्या पंधरवड्यात पाठविण्यात आल्या आहेत. या नोटा चलनात येण्यास काही दिवस लागतील. सध्या या नोटांची छपाई दिवसाला आठ दशलक्षापर्यंत पोहचली आहे. ती १२ दशलक्ष करण्यात येणार आहे.  नाशिकरोड प्रेसमध्ये दहापासून पाचशेपर्यंतच्या नोटांची छपाई होते. काही दिवसांपूर्वी पुन्हा नोटटंचाई झाल्याने नाशिकरोड प्रेस कामगारांनी पुन्हा साप्ताहिक सुटी न घेता काम सुरू केले आहे. तांत्रिक कारणांमुळे नोटांची छपाई घटली होती. दिल्लीतील लालफितीच्या कारभारामुळे १ एप्रिलपासून छपाई घटून दहा दशलक्षांवर आली. आता केंद्र सरकारकडून आदेश आल्याने छपाई दिवसाला १४ दशलक्ष करण्यात आली आहे. हे प्रमाण आणखी वाढविले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नोटप्रेसमध्ये दररोज ५००च्या ८० लक्ष आणि ५० रुपयांच्या ६० लाख नोटा छापत आहेत. सुटीच्या दिवशीही नोटा छपाईचे काम सुरूच असल्याचे प्रेसच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्टÑदिनीद  ेखील कामगारांनी नोटा छपाईच्या कामासाठी हजेरी लावली होती. रविवारी साप्ताहिक सुटीलाही नोटा छपाईचे काम सुरू आहे.

Web Title:  The printing speed increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक