मुद्रणालय कट्टा परिवारतर्फे मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:36 AM2019-08-15T01:36:38+5:302019-08-15T01:37:16+5:30
राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर भागात महापुरामुळे पूरग्रस्तांना मदतीसाठी भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणाल कट्टा परिवार व अथर्व मित्र परिवाराच्या वतीने विविध साहित्य, वस्तू गोळा करून रवाना करण्यात आले.
नाशिकरोड : राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर भागात महापुरामुळे पूरग्रस्तांना मदतीसाठी भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणाल कट्टा परिवार व अथर्व मित्र परिवाराच्या वतीने विविध साहित्य, वस्तू गोळा करून रवाना करण्यात आले.
सातारा, सांगली, कोल्हापूर आदी भागात अतिवृष्टी व महापुरामुळे बहुतांश रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संसारोपयोगी वस्तू, दुकानातील सर्व वस्तू, माल, शेती, जनावरे मृत्युमुखी पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्तांच्य मदतीसाठी मुद्रणालयाच्या कट्टा परिवार व अथर्व मित्र परिवाराच्या वतीने कपडे, किरणा, बिस्किट पॅकेट, राजगिरा लाडू, फरसाण, मुंग दालीचे पॅकेट, उपवासाचा चिवडा, औषधे आदी साहित्य गोळा करून ओझर येथील श्री हेल्पलाइन फाउंडेशनचे कल्पेश जैन यांच्याकडे सुपुर्र्द करण्यात आले. यावेळी मुद्रणालय मजदूर संघाचे माजी सरचिटणीस रामभाऊ जगताप, सुरेश बोराडे, हरिहर पहाडी, प्रशांत कापसे, संजय दुसाने, राजेंद्र गवळी, काशीनाथ पाटोळे, दत्ता जाधव, योगेश पाळदे, नीलेश गोडसे, सुनील गुप्ता, नितीन गुळवे, ज्ञानेश्वर शेळके, अरविंद गांगुर्डे, प्रकाश सुजगुरे, गमेश कळमकर, सुनील शुंगारपुरे, माणिक पाळदे, जगदीश सागर, किरण ढोमसे, दिलीप भावनाथ, तुकाराम सरोदे, सुनील पोरजे, भरत शिरसाठ, आदी उपस्थित होते.