आधी सर्वेक्षण, मग लाभाची चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:22 AM2018-12-13T01:22:18+5:302018-12-13T01:22:37+5:30

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली.

 Prior survey, then the discussion of gains! | आधी सर्वेक्षण, मग लाभाची चर्चा!

आधी सर्वेक्षण, मग लाभाची चर्चा!

Next

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली. शेतकºयांना पूर्वकल्पना न देता महासभेत हा विषय मांडलाच कसा, असा प्रश्न करीत विविध मागण्यांची सरबत्ती केली. विशेषत: अधिक लाभ का देत नाही तसेच वाढीव चटई क्षेत्र किती देणार, असा प्रश्न केल्यानंतर प्रशासनाने प्रस्तावित योजनेसाठी आधी सर्वेक्षण करू द्या मग लाभ किती मिळू शकतो याची पडताळणी करून लाभ किती मिळू शकतो हे सांगता येईल, असेच उत्तर शेतकºयांना देण्यात आले. अखेरीस शेतकºयांना सर्वेक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक बोलावू असे सांगण्यात आले तर कंपनीने सर्वेक्षण केल्यानंतर तीन महिन्यांत सर्व पडताळणी करून शेतकºयांना किती जमीन मिळेल किंवा वाढीव फायदे मिळतील याबाबत माहिती देऊ शकू, असे सांगण्यात आले.
मौजे नाशिक आणि मौजे मखमलाबाद शिवारात सुमारे सव्वासातशे एकर क्षेत्रात नगर रचना योजना आणि नंतर खास नियोजनबद्ध नगरी वसविण्याची स्मार्ट सिटी अंतर्गत योजना असून, त्यासंदर्भात बुधवारी (दि. १२) स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल तसेच नगररचनाकार कांचन बोधले यांनी महाकवी कालिदास कला मंदिरात सादरीकरण केले. यावेळी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडकेदेखील उपस्थित होत्या.
मौजे नाशिक शिवारातील ५४ तर मखमलाबाद येथील वीस अशा ७४ सर्व्हे क्रमांकावर एकूण ७५४ एकर क्षेत्रात महापालिका खास नियोजनबद्ध शहर वसविणार आहे. त्यासाठी आधी नगररचना योजना राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शेतकºयांकडून जमिनी घेऊन त्या एकत्रित करून एकच सर्व्हे नंबरप्रमाणे गृहीत धरून लॅण्ड पुलिंग करण्यात येईल आणि त्यानंतर पन्नास टक्के जागा शेतकºयांना परत देण्यात येतील. यात भूसंपादनाचा प्रकार नसून बाधित शेतकरीच भागीदार असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना लाभ मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली तसेच कांचन बोधले यांनी महापालिकेने एकदा इरादा जाहीर केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याला राजपत्रात प्रसिद्धी मिळेल आणि त्यानंतर हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही होऊन अंतिमत: नऊ महिन्यांत योजना अंतिम होईल तसेच तीन वर्षांत योजना पूर्ण होईल असे सांगितले.
मग, प्रस्तावाची घाई कशासाठी ?
महापालिकेच्या वतीने शेतकºयांना नगररचना योजना प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले, तसेच तत्पूर्वी शेतकºयांना अहमदाबाद दौरा घडविण्यात आला. त्याआधी महासभेवरच मखमलाबाद येथे नगररचना परियोजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला; मात्र हा सर्व उलटा क्रम ही योजना राबविण्याचा प्रस्ताव महासभेत कसा काय पाठविला गेला, असा प्रश्न शरद कोशिरे यांच्यासह अन्य शेतकºयांनी केला.

Web Title:  Prior survey, then the discussion of gains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.