नागरिकांचा जीव वाचविण्याला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:28+5:302021-04-13T04:14:28+5:30
नाशिक : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे प्रथम प्राधान्यावर आहे. नागरिकांचे जीव वाचविणे राज्य शासनाचे प्राधान्य आहे. लोकांचा ...
नाशिक : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे प्रथम प्राधान्यावर आहे. नागरिकांचे जीव वाचविणे राज्य शासनाचे प्राधान्य आहे. लोकांचा जीव धोक्यात आलेला असताना केवळ विकासाचा विचार करण्यापेक्षा जीवांचा विचार महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला पाहिजे यासाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मालेगाव व नाशिक जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्य सरकार नागरिकांच्या जीवाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. राज्यात कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढला असल्याने रुग्णांना बेड, रेमडेसिविर व ऑक्सिजन मिळत नाही. त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्ण ठेवायलादेखील जागा मिळणार नाही. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे.
नागरिकांनीदेखील आधीच सावध झाले पाहिजे, बंधने पाळली नाहीत तर प्रयत्न हाताबाहेर जातील. त्यामुळे पंधरा दिवसांचे कडक निर्बंध पाळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
--इन्फो--
साठेबाजांवर कठोर कारवाई
रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होत आहे. त्यात बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. दोन-तीन दिवसांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. रेमडेसिविरचा गैरप्रकार करणारे, तसेच जादा दराने विक्री करताना आढळून येणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला.