पुरोहित एकांकिका स्पर्धेत वाढती चुरस
By admin | Published: December 23, 2015 11:21 PM2015-12-23T23:21:20+5:302015-12-23T23:22:20+5:30
पारितोषिक वितरण : जिल्ह्यातील शाळा व नाट्यसंस्थांचा सहभाग
नाशिकरोड : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या कै. वा.श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेत जिल्ह्यातील शाळा नाट्यसंस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत.
मंगळवार दि. १५ रोजी येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन रंगकर्मी किरण समेळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मधुकर जगताप होते. बुधवारी विद्या प्रबोधिनी शाळेचे एक होता वाघ, श्रीमती सुनंदा लेले विद्यालयाची रानमेवा पक्ष्यांना ठेवा, रंगुबाई जुन्नरे शाळेची रावणातला राम, कृपा सामाजिक संस्थेची सपान तर लोकहितवादी मंडळाची अंधार फुले या एकांकिका सादर झाल्या. अंधार फुले या एकांकिकेचे लेखन मुकुंद कुलकर्णी यांनी, तर दिग्दर्शन प्रशांत वाघ यांनी केले. यात ओम पवार, इशा देव,दिशांत भास्कर, रेणूका कोठारकर, शाल्वी देशपांडे, स्वाती मोरे ऋषिकेश पवार आदिंनी भूमिका केल्या. या स्पर्धेत विविध विषयांवर आधारित व बालकांच्या समस्या मांडणाऱ्या एकांकिका सादर झाल्या. येथील आनंद ऋषी विद्यालयाची शुरा मी वंदिले, यशोधामाता बिटको गर्ल्स हायस्कूलचे कुणाच्या खांद्यावर, धनवर्धिनी संस्थेचे केल्याने होत आहे रे, एचएएल मराठी शाळेचे मेरिट, प्रबोधिनी ट्रस्टचे शहाणपण देगा देवा या एकांकिका सादर झाल्या. गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या चार एकांकिका सादर होणार आहेत. दुपारी ३ वाजता संदेश कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे, असे आयोजकांनी कळविले.