आजपासून पुरोहित एकांकिका स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:36 PM2018-12-25T23:36:26+5:302018-12-25T23:36:43+5:30
शतक महोत्सव साजऱ्या करणाºया नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ४१व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि.२६ डिसेंबर रोजी पु. इ. स्कूल नाशिकरोड येथे करण्यात येणार आहे.
नाशिक : शतक महोत्सव साजऱ्या करणाºया नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ४१व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि.२६ डिसेंबर रोजी पु. इ. स्कूल नाशिकरोड येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई येथील सुप्रसिद्ध सिने, नाट्य अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नाशिकरोड संकुलात सादर होणाºया एकांकिका स्पर्धेत नवीन मराठी शाळा (घर २१ व्या शतकातले), कै. जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूल (अशी पाखरे येती), श्रीमती र. ज. चौव्हाण (बिटको), गर्ल्स हायस्कूल (पराधीन आहे जगाती), पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल (मला मोठं व्हायचय), आरंभ महाविद्यालय (रणरागिणीचे बलिदान), महिला महाविद्यालय (तिचं अस्तित्व) या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. यानंतर संस्थेच्या नाशिक, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव या संकुल ठिकाणी त्या परिसरातील शाळा एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. या एकांकिकांचे बक्षीस वितरण गुरुवार, दि. ३ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. प्रतिभावान दिग्दर्शक व संस्थेतील माजी मुख्याध्यापक कै. वा. श्री. पुरोहित यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते.
संस्थेतर्फे सातत्याने गत ४० वर्षांपासून महाराष्ट्रातील शालेय स्तरावरील ही एकमेव एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धांतून अभिनेता डॉ. गिरीश ओक, दिग्दर्शक कै. राजू पाटील यांसह असंख्य कलाकार चित्रपट सृष्टीला मिळालेले आहेत. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले आहे.