सरकारचे पळालेल्यांना अभय, सहकार्य करणा-यांना तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 07:08 PM2018-03-02T19:08:49+5:302018-03-02T19:08:49+5:30

नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ध्वनीफितीचाही उल्लेख केला. गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या भ्रष्टाचाराचे व कारभाराचे विविध प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडले आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही कारणावरून बदनाम करण्यासाठी सरकारने हा प्रयत्न केला आहे.

Prison held to abduct the supporters of the government, to abusers and co-workers | सरकारचे पळालेल्यांना अभय, सहकार्य करणा-यांना तुरुंगवास

सरकारचे पळालेल्यांना अभय, सहकार्य करणा-यांना तुरुंगवास

Next
ठळक मुद्देजयंत पाटील : धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्नमुंडे यांच्यावरील आरोपाने राष्टÑवादीला काही नुकसान नाही,

नाशिक : देशात कोणतीही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध होण्याअगोदर केंद्र व राज्य सरकारकडून संबंधितांना तुरुंगात डांबले जाते. राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात तर कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही, असे असतानाही गेल्या २२ महिन्यांपासून त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे. भुजबळ यांनी चौकशीत सर्व प्रकारचे सहकार्य केलेले असूनही कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करणारा नीरव मोदी याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत करण्याचे तर चौकशीत सहकार्य करणाºया भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याचा उद्योग सरकारने सुरू केल्याचा आरोप माजी वित्तमंत्री आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ध्वनीफितीचाही उल्लेख केला. गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या भ्रष्टाचाराचे व कारभाराचे विविध प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडले आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही कारणावरून बदनाम करण्यासाठी सरकारने हा प्रयत्न केला आहे. मुंडे यांनी या संदर्भात आपली बाजू मांडली आहे व त्यांनी स्वत:च चौकशीची तयारी दर्शविली आहे. या सा-या प्रकरणात विधीमंडळालाच आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आल्यामुळे राष्टÑवादीचे आमदार हेमंत टकले यांनी हक्कभंगाची सूचना दिली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावरील आरोपाने राष्टÑवादीला काही नुकसान सोसावे लागणार नाही, असेही पाटील म्हणाले. सरकारची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे जो घटक वा व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलेल त्याच्या मागे सरकार लागते हे यानिमित्ताने सिद्ध झाले असे सांगून २००७ मध्ये दहा लाख रुपये लाच घेतल्याच्या प्रकरणात दहा वर्षांनी कार्ती चिदंबरम् याला आत्ताच अटक कशी? असा सवालही त्यांनी केला. टू जी स्कॅमबाबतदेखील अशाच प्रकारे घोटाळा सिद्ध होण्यापूर्वीच अटक करण्यात आली व तुरुंगात डांबण्यात आले, परंतु न्यायालयात ते निर्र्दाेष ठरले त्यामुळे त्यांचे तुरुंगातील आयुष्य कोण परत करेन, अशी विचारणाही पाटील यांनी केली.
विधीमंडळात प्रश्न विचारण्यासाठी पैसे दिले-घेतले जातात काय? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी नकार दिला. ते म्हणाले सदस्यांकडून विचारले जाणा-या प्रश्नांची विगतवारी आॅनलाइन होते, त्यामुळे त्यात कोणता प्रश्न घ्यायचा हे ठरविण्याचे अधिकार अध्यक्षांना असल्याने ते शक्य नसल्याचे सांगितले.

Web Title: Prison held to abduct the supporters of the government, to abusers and co-workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.