कैद्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:01 AM2019-01-23T00:01:49+5:302019-01-23T00:08:29+5:30

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून न्यायालयीन कामासाठी कैद्याला वाहनात बसवत असताना संबंधित कैद्याने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना धक्काबुक्की करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 The prisoner beat the police officers | कैद्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण

कैद्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण

Next

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून न्यायालयीन कामासाठी कैद्याला वाहनात बसवत असताना संबंधित कैद्याने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना धक्काबुक्की करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील चकलांब पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय किसनराव जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी एकशिंगे, रूईकर, गडकर आदी पोलीस वाहन (एमएच २३, एएस १९३२) हे घेऊन औरंगाबाद न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी सुरेश ऊर्फ पिन्या भारत कापसे रा. अंतरवली ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर यास घेण्यासाठी आले होते. कैदी कापसे हा पोलीस वाहनात बसत असताना त्याने पोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांना वडील व वकिलास फोन करू द्या, असे सांगितले. मात्र जोगदंड यांनी नकार देताच कैदी सुरेश ऊर्फ पिन्या कापसे याने जोगदंड यांना धक्काबुक्की केली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिवे मारण्याची धमकी
यावेळी मदतीस आलेल्या पोलीस कर्मचाºयांनादेखील शिवीगाळ केली. तसेच माझी माणसे बाहेर आहेत, त्यांनी पोलीस निरीक्षक आहेर व तुमचे घर पाहिलेले आहे. मी पाच- पन्नास लाख रुपये खर्च करून बेत पाहून घेईल, अशी धमकी देत आरडाओरड करीत मला न्यायालयात यायचे नाही, जेलमध्येच राहायचे आहे, असे सांगत गोंधळ घातला.

Web Title:  The prisoner beat the police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.