कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:51 AM2017-10-14T00:51:02+5:302017-10-14T00:51:13+5:30

खुनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तर प्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत मोहनगिरी गुरुजी दयागिरी ऊर्फ गौतम काशीनाथ जोशी (७१, मूळ, राहणार आवाहन आखाडा, ता़हलदर, जि़ सुरेंद्रनगर, उत्तर प्रदेश) यांनी गुरुवारी (दि़१२) मध्यरात्री चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़

 Prisoner commits suicide in imprisonment for life imprisonment | कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या

कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या

Next

नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तर प्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत मोहनगिरी गुरुजी दयागिरी ऊर्फ गौतम काशीनाथ जोशी (७१, मूळ, राहणार आवाहन आखाडा, ता़हलदर, जि़ सुरेंद्रनगर, उत्तर प्रदेश) यांनी गुरुवारी (दि़१२) मध्यरात्री चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाण्यात २००४ मध्ये महंत मोहनगिरी जोशीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यात न्यायालयाने महंत जोशी यांना १२ वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती़ गत दहा ते बारा वर्षांपासून मोहनगिरी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते़ त्यांचा बंदी क्रमांक पी-७१ असा होता़  महंत मोहनगिरी जोशी या बंदीवानाने गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातील रुग्ण विभागातील शौचालयात आपल्याकडील चादर फाडून स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही बाब लक्षात येताच तत्काळ उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़
महंत म्हणून ओळख असलेले मोहनगिरी यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना खुल्या कारागृहात ठेवलेले होते़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title:  Prisoner commits suicide in imprisonment for life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.