नाशिकरोड कारागृहात कैद्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:07 AM2017-09-03T01:07:03+5:302017-09-03T01:07:12+5:30
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील चर्मकला विभागातील कच्च्या मालाच्या गुदामामध्ये एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. यामुळे कारागृह वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील चर्मकला विभागातील कच्च्या मालाच्या गुदामामध्ये एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. यामुळे कारागृह वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैदी डॅनी ऊर्फ हरपालसिंग कृपालसिंग चौधरी ( ३१) मूळ राहणार धोरणगढा ता. रूबास, जि. भरतपूर, राजस्थान याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. कैदी डॅनी ऊर्फ हरपालसिंग चौधरी याने शनिवारी सकाळी १० वाजेपूर्वी कारागृहातील चर्मकला विभागाच्या कच्च्या मालाच्या गुदामामध्ये जुन्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून घरगुती कारणावरून त्याने आत्महत्या केल्याचा कारागृह प्रशासनाचा अंदाज आहे.