मनेगावच्या पृथ्वीराजची आतंरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:14 PM2020-03-08T18:14:17+5:302020-03-08T18:15:11+5:30

सिन्नर : सोसायटी आॅफ आॅटोमोटिव इंजिनिअर च्यावतीने अमेरिका येथील एॅरिझोना येथे आयोजित केलेल्या बाहा एस ए इंटरनॅशनल स्पर्धेसाठी आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील पृथ्वीराज नितीन शिंदे याची निवड करण्यात आलेली आहे.

 Prithviraj of Manegaon selected for international competition | मनेगावच्या पृथ्वीराजची आतंरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मनेगावच्या पृथ्वीराजची आतंरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next

अमेरिका येथे एॅरिझोना येथे १७ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान बाहा एस ए इंटरनॅशनल ही अंडरग्रॅज्युएट इंटर कॉलेजियन डिझाईन स्पर्धा होणार असून त्यासाठी पृथ्वीराजची निवड झाली आहे. यापूर्वी महिंद्रा पुरस्कृत सोसायटी आॅफ आॅटोमॅटिक इंजिनीअरच्या वतीने मध्यप्रदेश पीतमपुर येथे आयोजित केलेल्या बाहा राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या रेसर कारला प्रथम विजेता पदासह अन्य पाच प्रकारात प्रथम क्रमांक मिळाला होता. या यशानंतर आता त्यांची अमेरिकेतील एरिझोना येथे होणाºया स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. शिंदे यांच्यासह त्यांची टीम प्रिडेटर रेसिंग डी. वाय. पी. कॉलेज आॅफ इंजीनिअरिंग आकुर्डी पुणे यांची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये साकेत राऊत, प्रणव काटेकर, गौरव मोरे, तेजस धकाते, विशाखा कोटकर, अपूर्व महिन, अंशुला गुप्ता, ऋग्वेद गोवारीकर, आली अबू फर्जद यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्राचार्य विजय एम वडाई, प्रा. सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Prithviraj of Manegaon selected for international competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.