सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात ठार, 15 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 12:35 IST2025-02-02T12:34:44+5:302025-02-02T12:35:58+5:30

बस 200 फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे. 

Private bus accident at Saputara Ghat, seven killed, 15 injured | सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात ठार, 15 जखमी

सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात ठार, 15 जखमी

नाशिक : नाशिक - गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची तीव्रता सर्वात अधिक असून यामध्ये 7 जणांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बस 200 फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे. 

या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याची सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण की, बसचे घाटात कोसळल्याने दोन तुकडे झाले आहेत. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे. अपघात झालेल्या बसमधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील रहिवाशी असल्याच सांगण्यात येत आहे.

Web Title: Private bus accident at Saputara Ghat, seven killed, 15 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.