नाशिक-वलसाड रोडवर खासगी बस उलटली; ४० पेक्षा अधिक प्रवासी जखमी
By अझहर शेख | Updated: January 21, 2024 21:06 IST2024-01-21T21:06:44+5:302024-01-21T21:06:58+5:30
नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात ३१ जखमी प्रवासी दाखल करण्यात आले. त

नाशिक-वलसाड रोडवर खासगी बस उलटली; ४० पेक्षा अधिक प्रवासी जखमी
नाशिक : पेठ पोलीस ठाणे हद्दीत नाशिक- वलसाड रोडवर कोटंबी घाटात खासगी लक्झरी बस( WB19 H5715) ही पश्चिम बंगाल येथून गुजरात सोरटी सोमनाथ येथे ६५ प्रवासी घेऊन जात असताना बस उलटली.
या बसमधील४० पेक्षा अधिक प्रवासी जखमी असून जखमींना औषधोपचार साठी ग्रामीण रुग्णालय पेठ तसेच नाशिक शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात ३१ जखमी प्रवासी दाखल करण्यात आले. तसेच पेठ ग्रामीण रुग्णालयात १० जखमी रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.