खासगी बस-ट्रॅक्टर धडकेत चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:30 AM2017-07-25T01:30:01+5:302017-07-25T01:30:21+5:30

आझादनगर (मालेगाव) : शहरालगत महामार्गावरील संवदगाव फाट्याजवळ सोमवारी सकाळी १० वाजता खासगी लक्झरी बसने पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला ठोस दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला.

A private bus-tractor kills the driver on the spot | खासगी बस-ट्रॅक्टर धडकेत चालक जागीच ठार

खासगी बस-ट्रॅक्टर धडकेत चालक जागीच ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आझादनगर (मालेगाव) : शहरालगत महामार्गावरील संवदगाव फाट्याजवळ सोमवारी सकाळी १० वाजता खासगी लक्झरी बसने पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला ठोस दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला.  याप्रकरणी शेख आबीद शेख अन्वर (२३) रा. चिंचगव्हाण याने फिर्याद दिली. पवारवाडी पोलिसांनी लक्झरी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी (दि. २४) सकाळी १० वाजेच्या सुमारास माळधे शिवारातील संवदगाव फाट्याजवळ महामार्गावर खासगी बस (क्र. आरजे १८ पीए ८२८९) ही धुळ्याकडून नाशिककडे जात असताना चालकाने दुर्लक्ष करत ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यात ट्रॅक्टरचालक शेख अन्वर शेख गुलाब (५८) रा. चिंचवे जागीच ठार झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
तरुणावर कोयत्याने हल्ला; एकावर गुन्हा
आझादनगर (मालेगाव) : दोन हजार रुपये दिले नाही म्हणून मुशरफ खान साबीर खान याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मजेखान सरदार खान (६९) रा. मदनीनगर यांनी फिर्याद दिली. जखमी मुशरफ खान साबीर खान याकडे आरोपी राहील याचे मोटारसायकलचे दोन हजार रुपये बाकी होते. बाकी असलेले पैसे मागण्यासाठी संशयित आरोपीचे वडील गेले असता त्यांना पैसे दिले नाही. या कारणावरुन शुक्रवारी दुपारी  ४ वाजता मुशरफ खान जैतुन हजीन मशीदजवळ त्यांच्यात वाद होऊन राहील याने हातातील कोयत्याने वार करून जखमी केले. त्यास धुळे येथे उपचारार्थ हलविण्यात आले. या प्रकरणी पवारवाडी पोलिसात राहील (पूर्ण नाव माहीत नाही) व त्याचा भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जारवाल करीत आहेत.

Web Title: A private bus-tractor kills the driver on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.