नियम मोडणाऱ्या खाजगी आस्थापना सहा महिन्यांसाठी सील करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:05+5:302021-03-27T04:15:05+5:30

मालेगांव:-शासनाच्या मार्गदर्शक सुचना व जिल्हा दंडाधिकारी यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत कोरोनाच्या रुग्णसंख्येतही ...

Private establishments that break the rules will be sealed for six months | नियम मोडणाऱ्या खाजगी आस्थापना सहा महिन्यांसाठी सील करणार

नियम मोडणाऱ्या खाजगी आस्थापना सहा महिन्यांसाठी सील करणार

Next

मालेगांव:-शासनाच्या मार्गदर्शक सुचना व जिल्हा दंडाधिकारी यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत कोरोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही अत्यंत खेदाची बाब असून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या खाजगी आस्थापनांवर दंडात्मक कारवाईसोबतच आता अशा आस्थापना सहा महिन्यासाठी सील करण्यात याव्यात असे निर्देश उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी आढावा बैठकीत दिले.

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन होत असल्याच्या वाढत्या तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल, पोलीस व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उप विभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी प्रातांधिकारी डॉ.शर्मा बोलत होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव, लता दोंदे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, जगदीश बडगुजर, शाम बोरकुल, अब्दुल कादीर आदींसह महसूल, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत सर्व अधिकारी व पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून प्रभाग क्रं.१ ते ३ मधील विनामास्क फिरणाऱ्या ४२ नागरिकांसह चार खाजगी आस्थापनांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे २७ हजारांचा दंडही वसुल करण्यात आला. यावेळी बोलतांना प्रातांधिकारी डॉ.शर्मा म्हणाले, नागरिकांकडून दंड वसुलीचा शासनाचा उद्देश नसुन नागरिकांकडून आरोग्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास यापुढे कठोर निर्णय घ्यावे लागतील. असेही डॉ.शर्मा यांनी सांगितले.

Web Title: Private establishments that break the rules will be sealed for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.