देवळा बसस्थानकाला खासगी वाहनांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:25 PM2019-09-10T12:25:42+5:302019-09-10T12:26:54+5:30

देवळा : येथील बसस्थानकावर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा वेढा बसस्थानकाला पडत असल्यामुळे बसस्थानकात येणार्या व जाणाऱ्या बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Private vehicle towing to Deola bus station | देवळा बसस्थानकाला खासगी वाहनांचा वेढा

देवळा बसस्थानकाला खासगी वाहनांचा वेढा

googlenewsNext

देवळा : येथील बसस्थानकावर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा विळखा बसस्थानकाला पडत असल्यामुळे बसस्थानकात येणार्या व जाणाऱ्या बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
देवळा हे चौफुलीवर वसलेले शहर असून येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू असते. संपूर्ण नासिक जिल्हयात खड्डेमुक्त बसस्थानक म्हणून पूर्वीपासून या बसस्थानकाची ख्याती आहे. विंचूर - प्रकाशा महामार्गा पासून १०० मीटर अंतरावर असलेल्या देवळा बसस्थानकात दिवसभरात ४५० बसेसची ये जा सुरू असते. नासिक,नंदुरबार, साक्र ी, सटाणा, सुरत, पुणा, नासिक, मुंबई, नगर, धुळे, जळगाव आदी आगाराच्या बसेसची दिवसभर ये जा सुरू असते. यामुळे बसस्थानक सतत गजबजलेले असते. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते.आठवडे बाजारासाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने बाजारहाट करण्यासाठी देवळा येथे येतात. यापैकी अनेक जण आपल्या दुचाकीने येतात. शहरात पार्किंगची सुविधा नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या दुचाकी बसस्थानकाच्या आवारात उभ्या करतात. यामुळे बसस्थानक दुचाकींनी भरून जाते. बसस्थानकाच्या प्रवेश मार्गावरच अनेक भाजीपाला विक्र ेते वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्ता अडवून बसतात. या प्रवेश मार्गासमोरूनच आठवडे बाजारात जाण्याचा रस्ता असल्यामुळे ह्या ठिकाणी सतत गर्दी असते.पोलीस या ठिकाणी बॅरीकेटसचा वापर करत नसल्यामुळे सर्वत्र बेशिस्त निर्माण होते. यामुळे बस चालकांना या गर्दीतूनच वाट काढत बसस्थानकात प्रवेश करावा लागतो. त्यातच खासगी वाहने देखील बसस्थानकात ये जा करतात. यामुळे बसस्थानकात येणाºया व जाण्याºया बसला अडथळे निर्माण होतात.परिवहन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे.
--------------------------
स्वच्छ व सुंदर देवळा या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या देवळा नगरपंचायतीच्या वतीने शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. यामुळे शहराचे रूप पालटू लागले आहे. शहराचे होत असलेले विस्तारीकरण, व वाहनांची वाढती संख्या पाहता शहरात पार्कींगसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण शहरातील सुभाष चौक, पाच कंदील, बसस्थानक परिसरात वाहनचालक आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. देवळा नगरपंचायत प्रशासनाने शहरातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Private vehicle towing to Deola bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक