पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:08+5:302021-09-10T04:19:08+5:30
मालेगाव : येथील साधना कलामंच व संगमेश्वरातील कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयातर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेचा बक्षीस समारंभ ...
मालेगाव : येथील साधना कलामंच व संगमेश्वरातील कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयातर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. या. ना. जाधव विद्यालय व साधना कलामंचच्यावतीने पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेचा निकाल जाहिर करून बक्षीस वितरण करण्यात आले. पाचवी ते आठवी व नववी ते खुला गट अशा दोन गटांत स्पर्धा घेण्यात आल्या. प्रशांत हिरे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकाची भूमिका पार पाडली. स्पर्धकांना त्यांनी मार्गदर्शन केले. लहान गटात प्रथम --योगेश भगवान बागुल, द्वितीय- ध्वज सोनवणे, हर्षल बागुल, तृतीय -महेश जितेंद्र बच्छाव, उत्तेजनार्थ- केशव आदर्श जैन व राज प्रकाश जाधव हे स्पर्धक बक्षिसास पात्र ठरलेत. मोठ्या गटात प्रथम-करण प्रदीप आहिरे, द्वितीय- ऋतुजा सारंग पाठक, तृतीय -साक्षी साईका, संदीप लाड व उत्तेजनार्थ, दिशा दिलीप माळी, मानसी आहिरे, दिव्या सूर्यवंशी यांना बक्षिस देण्यात आले. कार्यक्रमाला महात्मा फुले शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील वडगे, प्राचार्य शेवाळे आर. डी. शेवाळे, पर्यवेक्षक बी. एस. मंडळ, प्रवीण वाणी, अशोक पठाडे, सारंग पाठक, सौ. चित्रा सूर्यवंशी, सायली अहिरे, हर्षिता अहिरे, कामिनी ठोके आदी उपस्थित होते.