किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:30 AM2020-12-16T04:30:41+5:302020-12-16T04:30:41+5:30

मुलांमधील कलागुण जगासमोर आणण्यासाठी अभिरंग बाल कला संस्था चांगले उपक्रम राबवित असते. यामध्ये मुलांचा जास्तीत जास्त सहभाग आवश्यक आहे. ...

Prize distribution of the Fort Build Competition | किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Next

मुलांमधील कलागुण जगासमोर आणण्यासाठी अभिरंग बाल कला संस्था चांगले उपक्रम राबवित असते. यामध्ये मुलांचा जास्तीत जास्त सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी आपापल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे, त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन भुजंग यांनी केले. ''किल्ले बनवा'' स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यात सहभागी झालेल्या बालगोपाळांनी किल्ल्यांच्या उत्कृष्ट प्रतिकृती तयार केल्या. परीक्षक म्हणून रवींद्र धारणे व संजय कुलकर्णी यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन किल्ल्यांची पाहणी केली. संस्थेचे संचालक अंबादास जोशी, माधव भुजंग, सुधीर शिखरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मधुर कुलकर्णी, वेदांग कुलकर्णी संस्थेचे सदस्य आदींनी परिश्रम घेतले.

-------------------

विराज व प्रभव मंदार पाटणकर यांना प्रथम क्रमांक, श्रीवर्धन सचिन शिखरे यास द्वितीय, कुणाल सचिन लोहगावकर व मंदार मोहन लोहगावकर यांना तृतीय, शिवम व रेणुका गोपाल उपाध्याय यांना लक्षवेधी तर राघव कौस्तुभ पाटणकर, सिद्धिविनायक बालगोपाल मित्रमंडळ, ओजस्वी हर्षल भुजंग, ओजस व अर्णव विशाल दीक्षित, अर्णेश व आदिनाथ सचिन शिंगणे, श्रीराम व रमा संकेत दीक्षित, श्रीकृष्ण व श्रेया यजुस दीक्षित यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

-------------

‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे पारितोषिक वितरणप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत संजय कुलकर्णी, माधवी भुजंग, मधुर कुलकर्णी आदी. (१५ टीबीके १)

Web Title: Prize distribution of the Fort Build Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.