जपानच्या चित्रकला स्पर्धेमध्ये नाशिकच्या संस्कृतीला पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:36+5:302021-01-13T04:33:36+5:30
नाशिक : सरस्वतीनगर येथील के. के. वाघ युनिव्हर्सल स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या संस्कृती अहिरे हिने जपानमधील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत पारितोषिक ...
नाशिक : सरस्वतीनगर येथील के. के. वाघ युनिव्हर्सल स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या संस्कृती अहिरे हिने जपानमधील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत पारितोषिक पटकावले आहे.
जपानच्या काओ शहरात ११ वी आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक चित्रकला स्पर्धा झाली. या स्पर्धेत जगातील विविध देशातील १३ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी सर्वात उत्कृष्ट ८ चित्रांना पारितोषिक मिळाले. त्या सर्वात ०८ उत्कृष्ट चित्रांपैकी भारतातील विद्यार्थिनी संस्कृती विनोद आहिरे हिच्या चित्राला पारितोषिक मिळाले. जपान कडून टोकिओ शहरात संपन्न होणाऱ्या पारितोषिक समारंभात सहभागी होण्याचा मानही संस्कृतीला मिळाला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या अमृता राव यांनी तिचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील कलाशिक्षक नीलेश चित्ते यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
फोटो---
१०संस्कृती अहिरे