तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:16 PM2019-07-27T23:16:25+5:302019-07-27T23:16:45+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.

The problem of double sowing was avoided in the taluka | तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले

तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले

Next
ठळक मुद्दे तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.

वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही.
तेव्हा देखील संपुर्ण तालुक्यात तालुक्यातील मुख्य पिक भात नागली वरई उडीद खुरासणी ही पिके ब-यापैकी शेतकऱ्यांना लाभदायक ठरली. या वर्षी अद्याप ५० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. अद्यापही काम थांबलेले नाही. अजुन पेरणीचे काम बाकी असुन आता तालुक्यात भरपुर पाउस पडल्याने पेरण्यांना आता काहीच अडचण नाही.
येत्या आठ दिवसात संपुर्ण खरीप लागवड पुर्ण होईल. कृषी विभागाच्या आतापर्यंत झालेल्या पेरणी लागवडीचा अहवाल पाहता भात एकुण सर्व साधारण क्षेत्र ९०५१ हेक्टर असून एकुण पेरणी २५४० हेक्टर, नागली सर्वसाधारण क्षेत्र ३०३० हेक्टर. एकुण पेरणी २६० हेक्टर,
वरई एकुण सर्वसाधारण क्षेत्र ३५५७ हेक्टर, एकुण पेरणी १८२ हेक्टर. तूर १०१९ (सर्वसाधारण क्षेत्र) एकुण पेरणी ९५ हेक्टर. उडीद सर्वसाधारण क्षेत्र १६४८ हेक्टर. पेरणी ३४०२ हेक्टर. भुईमुग १४२ हेक्टर, खुरसणी ४८६ हेक्टर सोयाबीन ५ हेक्टर. ऊस ३९ हेक्टर अशा प्रकारे पेरणी पुर्ण झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुबार पेरणीची गरज नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाळी नक्षत्रे सुरु झाल्यानंतर मृग आर्द्रा ही नक्षत्रे कोरडी गेल्या नंतर मात्र पावसाला सुरुवात झाली. तत्पुर्वी आर्द्रात एक चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या होत्या. नंतर पेरण्या झाल्या नाहीत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ६ जुलै पासुन तालुक्यात जोरदार पाऊस सुरु झाला. ९ जुलैपासून पाऊस जो थांबला तो आठदहा दिवस थांबला. पण पेरणी लागवड आज पर्यंत ५० टक्के पुर्ण झाली आहे.
आठ दिवसाआधीच पेरण्या १०० टक्के पुर्ण होतील त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुर्वी देखील दुबार पेरणी करावी लागली नाही आणि यावेळेस देखील दुबार पेरणीची आवश्यकता नाही.
वेळुंजे ११४५ तर हरसुल ९९७ मिमि पावसाची सरासरी झाली आहे. संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची सरासरी १२०४ मिमि झाल्यानंतर आता पेरणी लागवड खणणी, आवणीला वेग आला आहे.
खणणी, आवणी करीता २०० ते २५० रु पये रोजंदारी मिळते. तर औतकरी यांना ५०० ते ७०० रु पये रोजंदारी दिली जाते. तसेच लवकर कामे आटोपण्याच्या दृष्टीने यांत्रिकी शेती म्हणुन ट्रॅक्टरद्वारे चिखल करणे, आळवट फिरवणे यासाठी ट्रॅक्टरची रोजंदारी चालकासह एका तासाला ८०० ते १००० रु पये मोजावे लागतात. तसेच शेतकºयाला शेतमजुरीसाठी मजुर आणण्यासाठी खाली कोकणात वरती साप्ते कोणे सोमनाथ नगर शिवाजीनगर वेळे वाघेरा गणेशगाव जातेगाव आदी गावांमधुन मजुर उपलब्ध असले तरच मिळतात. त्यांना आणणे व सायंकाळी घरी पोहविणे यासाठीची जबाबदारीही मालक शेतकºयाला घ्यावी लागते. बळीराजाने ताठ मानेने आपला कणा मोडुन देता आपला धीर खचु न देता अशा संकटाशी मुकाबला केला पाहिजे. मासेमारी करणारे कोळी बांधवांवर अनेक संकटे येतात. पण तो परत उभा राहतोच ना? तसा शेतकºयाने टोकाचा विचार न करता परत आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे.
- सुनील पोरजे,
शेतकरी, पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर.

Web Title: The problem of double sowing was avoided in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी