बंधारा दुरु स्ती केल्याने मिटला गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 04:29 PM2020-10-04T16:29:59+5:302020-10-04T16:30:25+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जऊळके येथील अनेक दिवसापासून दुरु स्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा सहा लक्ष रु पये खर्च करून दुरु स्त झाल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जऊळके येथील अनेक दिवसापासून दुरु स्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा सहा लक्ष रु पये खर्च करून दुरु स्त झाल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
येथील गावालगत असलेला बंधारा भरला तर गावातील बोअरवेल सह आसपासच्या विहिरींना पाणी उतरते पण दरवर्षी पावसाने बंधारा दोन्ही बाजुने फुटून पाणी वाहुन जात होते. त्यामुळे गावाला ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. ही समस्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर यांच्या लक्षात आणून देताच यांच्या प्रयत्नातून सहा लक्ष रु पये खर्च करून बंधाऱ्याची दुरु स्ती केली व बंधाºयातील गाळ काढुन खोलीकरण झाल्याने नुकतेच पालखेड डावा कालव्याच्या ओवरफ्लो आवर्तनातुन बंधारा भरल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.
त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक शांताराम सोनवणे, पांडुरंग जाधव, भाऊराव जाधव, प्रभाकर खैरनार, अमोल सोनवणे, ज्ञानेश्वर दराडे, सावळीराम खैरनार, दिनकर दराडे यांनी बंधाºयाचे जलपूजन केले.
जऊळके येथील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने अनेक दिवसापासून ग्रामस्थांची बंधारा दुरु स्तीचा प्रश्न मार्गी लागुन पालखेड डावा कालव्याच्या ओवरफ्लो आवर्तनातुन बंधारा भरल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने समाधान वाटले .
- संजय बनकर, सभापती, कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, नाशिक. (फोटो ०४ जऊळके)