हरिणांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 04:09 PM2018-11-11T16:09:30+5:302018-11-11T16:09:33+5:30

ममदापूर : येवला तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे ममदापूर राजापूर परिसरातील वन्यप्राण्यांना फायदेशीर झाला आहे. येथील वन्य जीवाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येवला तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यातच वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली होती.

 The problem of drinking water of stagy is solved | हरिणांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

हरिणांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

Next
ठळक मुद्देअवकाळी पावसाने परिसरात पिण्याच्या पाण्याचे साठे थोड्याफार प्रमाणात भरले आहे. ममदापूर संवर्धन राखीव मध्ये वनविभागाने गेल्या तीन-चार वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी छोटे-मोठे वन तळे व पाणवठे तयार केले आहेत.


ममदापूर :
येवला तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे ममदापूर राजापूर परिसरातील वन्यप्राण्यांना फायदेशीर झाला आहे. येथील वन्य जीवाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येवला तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यातच वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली होती.
परंतु अचानक झालेल्या अवकाळी पावसाने परिसरात पिण्याच्या पाण्याचे साठे थोड्याफार प्रमाणात भरले आहे. ममदापूर संवर्धन राखीव मध्ये वनविभागाने गेल्या तीन-चार वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी छोटे-मोठे वन तळे व पाणवठे तयार केले आहेत. त्याचाच फायदा ममदापूर राजापूर परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने सदर साठ्यामध्ये पाणी साचले आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने हरीण, लांडगे तरस मोर, ससे आदींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. ममदापुर, राजापुर डोंगराळ भाग असून थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी वाहण्यास सुरु वात होऊन पाणी साठे भरण्यास मदत होते. या परिसरात हजाराच्या वरती काळवीट आणि हरणांची संख्या आहे.यासाठी वनविभागाने ममदापूर संवर्धनामध्ये छोटे छोटे नाला बांध तयार केलेआाहेत. त्यांच्यामध्ये पाणी साचल्याने गवताची पण निर्मिती होते त्यामुळे हरणांचा चाº्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागण्यास मदत होते. वनविभागाने सौरऊर्जेवर चालणारे पंप या परिसरात बसविले आहेत. त्याद्वारे पाणी काढून लहान तयार केलेल्या तळ्यांमध्ये साठवण्यात येते. यामुळे जंगल सोडून मानवी वस्तीकडे हरीने येण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आह.े या वर्षीच्या भीषण दुष्काळात वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन वन्य प्राणी स्थलांतर करतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती.परंतु निसर्गाने अचानक अवकाळी पावसाने या परिसरातील पाणी साठे भरल्याने हे स्थलांतर सध्यातरी थांबणार आहे. ममदापूर संवर्धन राखीव मध्ये हरीण पाहण्यासाठी दूरदूरवरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. हरीण पाहण्यासाठी वनविभागाने ममदापूर संवर्धन राखीव मध्ये सायकल ट्रॅक तयार केला असून सायकल वरून हरीण पाहण्याचा आनंद या परिसरात पर्यटक घेत असतात. पाणी साठे तयार झाल्याने या परिसरात आणखी जवळून हरीण पाण्याचा पर्यटकांना जुळून येणार आहे. (11येवलाममदापूर )

Web Title:  The problem of drinking water of stagy is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.