येवला औद्योगिक वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 07:08 PM2018-11-01T19:08:08+5:302018-11-01T19:08:28+5:30

येवला औद्योगिक सहकारी वसाहतीमधील उद्योजकांना सतावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडल्याने सुटला आहे. वसाहतीतील १८ उद्योगांसाठी पिण्याचे पाणी योजनेचे उद्घाटन अ‍ॅड. माणकिराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

The problem of drinking water in Yeola industrial colony is solved | येवला औद्योगिक वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

येवला औद्योगिक वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

Next

येवला : येवला औद्योगिक सहकारी वसाहतीमधील उद्योजकांना सतावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडल्याने सुटला आहे. वसाहतीतील १८ उद्योगांसाठी पिण्याचे पाणी योजनेचे उद्घाटन अ‍ॅड. माणकिराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वसाहतीचे अध्यक्ष अनिल कुक्कर,उपाध्यक्ष दत्ता महाले, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी,अ‍ॅड नवीनचंद्र परदेशी यांच्या हस्ते नारळ फोडून योजनेची सुरु वात करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता.३८ गाव पाणी पुरवठा योजनेमधून वसाहतीस पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कुक्कर,महाले यांच्यासह संचालक मंडळाने सातत्याने पाठपुरावा केला.सध्या व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारून ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी घेतले आहे.औद्योगिक वसाहतीसह अंगणगावच्या काही ग्रामस्थांना देखील या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
याप्रसंगी संचालक भोलानाथ लोणारी, शाम कंदलकर,नवीनचंद्र परदेशी, विष्णू खैरनार,सुहास अलगट, अमोल वाघ, राजेश भंडारी, मयूर गुजराथी, रामदास काळे,अशोक शहा, राजू पवार, सुवर्णा गायकवाड,भाऊसाहेब मढवई,नवनाथ घुले,अनिल मुथा,नारायण गायकवाड,व्यवस्थापक सोपान पैठणकर उपस्थित होते.
 

Web Title: The problem of drinking water in Yeola industrial colony is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.